Pune News : राज्यातील विविध सरळसेवा भरती परीक्षांमध्ये सातत्याने पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी पेपरफुटीवर कायदा करण्याची जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. तसेच खासगी कंपन्यांऐवजी राज्य लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती घेण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केली. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
राज्यातील विविध सरळसेवा भरती परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी पेपरफुटीवर राज्य सरकारने कडक कायदा करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महेश बडे, किरण निंभोरे, अनंत झेंडे यांच्या शिष्टमंडळाने स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.
यावेळी उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर पेपर फुटी विषयी कडक कायदा करण्यात यावा, सध्या पदभरती मोठ्या संख्येने असून शुल्क कमी करून एकदाच एक हजार रुपये घेऊन सर्व विभागाचे अर्ज भरता यावे, शासकीय पॉलिटेक्निकल कॉलेज व खाजगी परिक्षा केंद्र बंद करून परीक्षा फक्त टीसीएस आयओएन या अधिकृत केंद्रावरच घेण्यात यावी. केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व सरळ सेवा भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात याव्या, या प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या.
उमेदवारांच्या मागण्या
1) राज्यसेवेद्वारे एक हजार जागांची महाभरती करावी.
2) पीएसआय मुख्य परीक्षेत कायदा विषय समाविष्ट करण्यात यावा.
3) सारथी, बार्टी, महाज्योती, टार्टी, या संस्थांसाठी एकात्मिक धोरण आखावे.
4) दिव्यांगांसाठी संस्थेनिहाय व जातीनिहाय पाच टक्के आरक्षण ठेवावे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.