Indian judiciary controversy : माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांच्या भेटीवर अंधश्रद्धा निर्मुलन समिती संस्थेचे अध्यक्ष श्याम मानव यांनी जोरदार टीका केली आहे.
'धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असाल, तर भूषण गवई यांनी या पुढे बाबासाहेबांचे नाव घ्यायचं नाही,' असा घणाघात श्याम मानव यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धाम सरकारला कुटुंबासह भेट देत, धीरेंद्र शास्त्री महाराज यांची भेट घेतली. या भेटीची फोटो समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाले आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी अमरावतीत (Amravati) इथं पत्रकार परिषद घेत, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या या भेटीवर टीका केली आहे. भूषण गवई धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडायला गेले होते, याचा मला प्रचंड शॉक बसलाय, असा टोला श्याम मानव यांनी लगावला आहे.
भूषण गवई हे रा. सू. गवई यांचे सुपुत्र आहे. यापूर्वी विक्तू बाबांचा सत्कार दीक्षाभूमीवर घेतला होता. त्यावेळेस केलेल्या विरोधाची आठवण, श्याम मानव यांनी करून देताना, धीरेंद्र शास्त्री यांच्या भेटीवरून श्याम मानव यांनी, भूषण गवई यांना चांगलेच सुनावले.
'मी स्वतः आंबेडकरी विचाराचा आहे. आंबेडकरी विचारांचे मी दूध पिलो आहे, भूषण गवई यांच्या या विधानांची आठवण करून देताना, पण आपण धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असाल, तर आता तुम्ही यापुढे आंबेडकरांचे नाव कधीही घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. तोंडातून पुन्हा आंबेडकरांचे नावच काढू नका. बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्ही गमावलेला आहे,' असा घणाघात श्याम मानव यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.