Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
विदर्भ

अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा कोणाला पाठिंबा? थोरातांनी स्पष्टच सांगितले

सरकारनामा ब्यूरो

Andheri East by-election : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. त्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा पोटनिवडूक होत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना अंधेरी पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारला. यावर थोरात यांनी याबाबत आमचे पक्षश्रेष्ठी एकत्र बसून निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. ते बुलडाण्यात बोलत होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला जवळपास 28 हजार मते पडली होती. त्यामुळे काँग्रेस काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे असणार आहे.

थोरात म्हणाले, अंधेरीच्या निवडणुकीत काँग्रेस म्हणून आम्ही एकत्रितच राहू. आमचे पक्षश्रेष्ठी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. हा निर्णय होईल तेव्हा आम्ही तो जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. हे सरकार कस बनले हे सर्वांना माहिती आहे. सर्वोच्च न्यायाल्याच्या निकालावर अवलंबून आहे की हे सरकार किती दिवस टिकेल, असा टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला.

'भारत जोडो' यात्रेचे महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. थोरात म्हणाले, 'भारत जोडो' यात्रा सभेचे आयोजन शेगाव येथे करण्याचा आमचा आग्रह आहे. त्यांच्या टीमने जर मान्य केले तर शेगाव येथेच राहुल गांधी यांची सभा होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT