MP Balu Dhanorkar at WCL Sarkarnama
विदर्भ

बाळू धानोरकर म्हणाले, आता लढा प्रकल्पग्रस्तांच्या नॉमिनींसाठी...

वेकोलिच्या या कायद्यात संशोधन करण्याची गरज आहे. आता पुढील लढा प्रकल्पग्रस्तांच्या नॉमिनींसाठी देऊ, असे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर MP Balu Dhanorkar आज म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : वेकोलिच्या प्रकल्पांमध्ये जमिनी गेल्यानंतर त्या जमिनीच्या मालकांना आपला नॉमिनी ठरविण्याचा अधिकार नाही. तर रक्ताच्या नात्यांचे कारण पुढे करून भूस्वामींच्या विवाहित मुली, जावई, नात या नॉमिनींना नाकारले जाते. वेकोलिच्या या कायद्यात संशोधन करण्याची गरज आहे. आता पुढील लढा प्रकल्पग्रस्तांच्या नॉमिनींसाठी देऊ, असे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर आज म्हणाले.

खासदार धानोरकर म्हमाले, वेकोलिच्या नियमानुसार रक्ताच्या नात्याचे कारण दर्शवून भूस्वामींच्या नॉमिनीना अनेक वेळा नाकारले जाते. ज्याची जमीन त्याला नॉमिनी ठरवायचा अधिकार का नाही, असा प्रश्‍न करून हा बदल करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे ते बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील धोपटाला प्रकल्पग्रस्तांना धनादेश वाटप कार्यक्रमात म्हणाले. यावेळी आमदार सुभाष धोटे, क्षेत्रीय महाप्रबंधक डे, राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, ओबीसी नेते उमाकांत धांडे, येरणे, पुलैया तसेच शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार सुभाष धोटे म्हणाले कि, या केंद्रात व राज्यात माजी मंत्र्यांचे सरकार होत. परंतु ते माजी मंत्री आपल्याला न्याय देऊ शकले नाही. परंतु पद गेल्यानंतर ते आता राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या दारी येऊन हे सर्व मीच केलं असा गवगवा करीत आहेत. परंतु आता त्यांचा राजकीय हेतू लक्षात घेता त्याला बळी पडता काम नये असे त्यांनी प्रकल्पग्रस्तांना सांगितले. इतके वर्षे पदावर असताना त्यांची कोणी अडवणूक केली होती असा सवाल त्यांनी केला.

यावेळी रामभाऊ वांढरे, शुभम मांडवकर, कुणाल मांडवकर, विनोद नक्षीने, संजय वैरागडे, विजयलक्ष्मी परसोटवार, रुपेश नक्षीने, बालाजी या प्रकल्पग्रस्तांना खासदार बाळू धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांचे शुभहस्ते चेक वाटप करण्यात आले. खासदार बाळू धानोरकर यांनी धोपटाला प्रकल्पग्रस्तांना व वेकोलिला भरपूर सहकार्य केले. धोपटाला प्रकल्प खासदार बाळू धानोरकर यांच्या मदतीने मार्गी लागला, त्यांच्या मध्यस्थीने पॉवर कंपन्यांसोबत MOU करण्यात आला असे प्रतिपादन क्षेत्रीय महाप्रबंधक डे यांनी केले.

आता सुमारे १५० करोड चे वाटप शेतकऱ्यांना होत असून ८२० नोकऱ्या प्रकल्पात देत आहे. त्यांपैकी ७५० प्रकल्पग्रस्तांना नोकरीचा मार्ग मोकळा झाला असून ५०-६० प्रकल्पग्रस्तांना लवकरच नोकरी मिळणार आहे. यापुढे प्रकल्पग्रस्तांना एकरी २० लाख रुपये दरासाठी आपण प्रयत्न करणार, ८ ते १० लाख रुपये प्रतिएकराचा दर पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केला. चेअरमन CIL, ऊर्जामंत्री, CMD सर्वांसोबत बैठक घेतल्यावर धोपटालाचा प्रश्न मार्गी लागला. पुढे देखील येथील शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्र म्हणून मी सदैव सोबत राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT