Navneet Rana
Navneet Rana Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana : नवनीत राणांचा पराभव भाजपच्या जिव्हारी; लोकसभेच्या निकालानंतर पहिला राजीनामा...

Sunil Balasaheb Dhumal

Amravati Political News : लोकसभा निवडणुकीत 'मिशन 45' फेल झालेच, मात्र प्रचंड वाताहत झाल्याची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदातून मुक्त होऊन पक्षाचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर चर्चा सुरू असतानाच अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांचा पराभव झाल्याने भाजप शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिला.

राज्यात 48 पैकी 40 हून अधिक जागा जिंकण्याचा महायुतीला कॉन्फिडन्स होता. एक्झिट पोलनेही महायुती चांगली कामगिरी करत असल्याचे सांगितले होते. निकालानंतर मात्र भाजपने तयार केलेली सर्व हवा विरली आणि एक्झिट पोलचे आकड्यांचीही धूळधाण झाली. महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या, तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावे लागेल. ही बाब जिव्हारी लागल्याने फडणवीसांनी थेट उपमुख्यमंत्री पदातून मुक्त होण्याची इच्छाच व्यक्त केली.

दरम्यान, 2019 मध्ये अपक्ष म्हणून खासदार झालेल्या नवनीत राणा यांनी यावेळी लोकसभेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. नवनीत राणा निवडून येतील, असा विश्वास भाजप नेत्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांना होता. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यातून भाजप शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिला आहे. परिणामी लोकसभा निवडणुकीत ओढावलेल्या नामुष्कीने भाजपने उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

अमरावतीतून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत. त्यांना 5 लाख 26 हजार 271 मते मिळाली आहे. तर नवनीत राणा यांना 5 लाख 6 हजार 540 मते मिळाली. वानखेडेंनी 19 हजार 731 मतांनी आघाडी घेत राणांचा पराभव केला आहे. हक्काची सीट गेल्यानेच अमरावती शहराध्यक्षांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT