Nitin Gadkari Vs Vikas Thackeray : नितीन गडकरींचा पराभव अशक्य नाही; विकास ठाकरेंचा कॉन्फिडन्स...

NagpurLok Sabha Election 2024 Result : नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध ठाकरे असा थेट सामान रंगला होता. गडकरी यांनी पाच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येण्याचा दावा केला होता.
Nitin Gadkari, Vikas Thackeray
Nitin Gadkari, Vikas ThackeraySarkarnama
Published on
Updated on

राजेश चरपे

Nagpur Political News : भाजपचे हेविवेट नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा पराभव करणे शक्य नाही, हा भ्रम या निडणुकीतून दूर झाला. मला वर्षभराचा कालावधी मिळाला असता आणि धनशक्तीसोबत असती तर निश्चितच त्यांचा पराभूत करू शकलो असतो, असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी केला.

नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध ठाकरे असा थेट सामान रंगला होता. गडकरी यांनी पाच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येण्याचा दावा केला होता. कोट्यवधींची कामे केली, लोकांना मदत केली त्यामुळे आपल्याला नागपूरकर भरभरून साथ देतील असे त्यांना वाटत होते. मी नागपूकरांसाठी जे काही केले ते बघता घरोघरी जाऊन मतदारांना हात जोडण्याची गरज भासणार नाही असेही त्यांनी निवडणुकीपूर्वी एका कार्यक्रमात सांगितले होते.

याकडे लक्ष वेधून ठाकरे यांनी शेवटी घरोघरीच नव्हे तर गल्लोगली फिरावे लागल्याचे सांगितले. यापूर्वीच्या दोन निवडणुकीत अनुक्रमे तीन लाख आणि दोन लाख १७ हजारांचे मताधिक्य त्यांना मिळाले होते. यात निम्म्याने घट झाली आहे. पाच लाख सोडा अडीच लाखांचेही मताधिक्य त्यांना टिकवता आले नाही. अवघ्या एक लाख ३७ हजारांच्या मताधिक्यांनी ते निवडूण आले आहेत. त्यांचे मताधिक्य ८० हजाराने कमी करण्यात आपल्याला यश आले. ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी आहे.

मी उमेदवाराच्या स्पर्धेत नव्हतोच. लोकसभा लढण्याचा विचारही केला नव्हता. निवडून जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करायच्या पंधरा दिवासपूर्वी आपले नाव जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि नियोजनासाठी वेळ अपुरा पडला. काँग्रेसने आधीच कल्पना दिली असती तर निश्चितच त्यांचा पराभव केला असताही असेही विकास ठाकरे यांनी सांगितले.

Nitin Gadkari, Vikas Thackeray
Mahesh Gaikwad : आता आठ गोळ्या घालणार...; गोळीबारातून वाचलेल्या महेश गायकवाड यांना पुन्हा धमकी

मतदान आटोपल्यानंतर ठाकरे यांनी आपण एक लाखांच्या मताधिक्याने जिंकणार असल्याचा दावा केला होता. महाविकास आघाडीमुळे शहरात मतभेद नव्हते. संविधानाचा मुद्दा तापल्याने अनुसूचित जाती, जामती, मुस्लिम तसेच हलबा समाज महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणात वळेल असे दावे केले जात होता. निकालाची आकडेवारी बघता यात तथ्य असले तरी गडकरी यांचे अडीच लाखांचे मताधिक्य ठाकरे यांना भेदता आले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Nitin Gadkari, Vikas Thackeray
Shivsena UBT News : 'मला उमेदवारी हवी होती, खैरेंना दिली, जनतेने त्यांना..' ; अंबादास दानवे स्पष्टच बोलले..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com