Washim News: बच्चू कडू यांनी नागपूर ठप्प केल्यानंतर बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा यासाठी वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथून जाणाऱ्या हैदराबाद महामार्गावर व तसेच समृद्धी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने दोन्ही महामार्गवरील वाहतूक दोन तीन विस्कळीत झाली होती. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वाहतुकीची कोंडी करण्याचे प्रकार वाढत चालल्याने सरकाराची डोकेदुखी वाढली आहे.
राज्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला (Banjara Samaj Protest) त्यांच्या हक्काचे एसटीचे आरक्षण देण्यात यावे यासाठी राज्यात एका महिन्यात एकूण 25 मोर्चे काढण्यात आले. मात्र, त्याची दखल शासनाने घेतली नाही. आता राज्य सरकारने बंजारा समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सुरुवातीला 30 मिनिटांसाठी हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. यावेळी समृद्धी महामार्गांवर (Samruddhi Mahamarg) काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर समृद्धी महामार्गवरील आंदोलन मागे घेतल्याने वाहतूक सुरळीत झाली.
त्यानंतर अकोला - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात पोहरादेवी येथील महंत , बंजारा समाजातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी यांच्यासह अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, हिंगोली आदी जिल्ह्यातील बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते.
यावेळी महंत कबिरादास महाराज महंत संजय महाराज बंजारा क्रांती दलाचे कांतीलाल नाईक, तांडा सुधार समितीचे सचिव नाना बंजारा, धाडी समाजाचे अध्यक्ष राजू रत्ने, प्रा. अनिल राठोड, साहित्यिक डॉ विजय जाधव, डॉ सचिन पवार, बंजारा कवी , बंजारा आरक्षण कृती समितीचे श्रावण जाधव सेवाराम आडे आदी यावेळी उपस्थित होते.
मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे आणि त्यांचा ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करून वाहतुकीची कोंडी केली होती. त्यांची मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी तोच पॅटर्न वापरला. आता बंजारा समाजही सरसावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.