Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’ पूर्णत्वास! मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मारला फेरफटका, शिंदेंच्या हाती स्टेअरिंग

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSarkarnama
Published on
Updated on

Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी’ पूर्णत्वास...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणेपर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उदघाटन आज झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री होते. आता मुंबई ते नागपूरदरम्यानचा हा मार्ग पूर्ण झाला असून केवळ आठ तासांचा हा प्रवास असणार आहे. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारमधून महामार्गावर प्रवास केला. एकनाथ शिंदे यांच्या हाती कारचे स्टेअरिंग होते.

PM Narendra Modi : कुंकवाच्या झाडाचे रोपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निवासस्थानाच्या आवारात कुंकवाचे झाडाचे रोपण केले. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. १९७१ च्या युध्दात पराक्रम गाजविणाऱ्या कच्छमधील वीरांगना माता-बहिणींनी नुकतेच गुजरात दौऱ्यावर असताना मला ‘सिंदूर’चे रोपटे भेट दिले होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज मला पंतप्रधान निवासाच्या आवारात त्याचे रोपण करण्याचे भाग्य मिळाले. हे रोपटे आपल्या देशातील नारीशक्तीचे शौर्य आणि प्रेरणेचे सशक्त प्रतिक असेल, असे मोदींनी म्हटले आहे.  

RCB Rally Stampede : न्यायालयीन चौकशीचे आदेश

कर्नाटकातील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ११ क्रिकेटप्रेमींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हाही दाखल केला आहे. त्यामध्ये कुणालाही आरोपी करण्यात आलेले नाही. कर्नाटक हायकोर्टाने या घटनेची दखल घेतली आहे. आयपीएलचे पहिल्यांदाच विजेतेपद मिळविलेल्या आरसीबी संघासाठी स्टेडियममध्ये सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com