Chandrashekhar bawankule on Yogi Aditynath Sarkarnama
विदर्भ

गोरखपुरचे प्रभारी राहिलेले बावनकुळे म्हणाले, योगींना मिळणारे जनसमर्थन अभूतपूर्व आहे...

गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) झालेला विकास, महिला सुरक्षेत झालेली वाढ योगींच्या (Yogi Adityanath) विजयासाठी महत्वाची ठरल्याचे ते म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर या मतदारसंघात काम करण्याची संधी श्रेष्ठींनी या निवडणुकीत दिली. यावेळी त्यांचे काम जवळून बघता आले. त्यांचे काम अफाट आहे आणि मिळणारे जनसमर्थन अभूतपूर्व आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आजच्या निकालानंतर दिली.

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) १९८५ नंतर सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारा भारतीय जनता पक्ष (BJP) हा आघाडीचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांच्या कुशल प्रशासनात झालेल्या निवडणुकीचा विजय ऐतिहासिक मानावा लागेल. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात प्रचार करण्याची मला संधी मिळाली. त्यांना मिळणारे जनसमर्थन अफाट आहे. त्या बळावरच उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात अभूतपूर्व यश मिळविता आले.

देशात झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर आमदार चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रीय सत्तांतरणाचा पाया म्हणून उत्तर प्रदेशकडे बघितले जाते. उत्तर प्रदेशातील जनतेतेची योगी आदित्यनाथ यांच्यावर असीम श्रद्धा आहे. आगामी काळात ते राज्याच्या विकासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. गेल्या पाच वर्षांत उत्तर प्रदेशात झालेला विकास, महिला सुरक्षेत झालेली वाढ योगींच्या विजयासाठी महत्वाची ठरल्याचे ते म्हणाले.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघाचे प्रभारी होते. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, गोरखपूरमध्ये योगदान देण्याचे मला भाग्य लाभले. ही संधी म्हणजे एक प्रकारची गोरक्षनाथ पिठाची सेवा होती. तेथे कसलाही भेदभाव नव्हता. केवळ योगी आदित्यनाथांप्रती समर्पित जनतेचे दर्शन घडले. योगी आदित्यनाथ यांच्यावरचा तिथल्या जनतेचा विश्वास स्पष्ट दिसून येतो. आजचा विजय हा उत्तर प्रदेशाच्या जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. यासह मणिपूर, उत्तराखंड, गोव्याच्या विजयाबद्दल आमदार बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT