Chandrapur Kidney Racket , Ashok Uike  Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Kidney : निवडणुकीच्या तोंडावर वडेट्टीवारांसह पालकमंत्री उईकेंना आठवला किडनी पीडित,तब्बल 25 दिवसानंतर गाठलं चंद्रपूर

Chandrapur Election News: दिल्लीतील डॅा. रविंद्र सिंग आणि तामिळनाडूतील डॅा.राजरत्नम गोविंदस्वामी सध्या फरार आहे. या किडनी प्रकरणाची चर्चा देशभरात सुरु असताना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. उईके अत्यंत असंवेदशीलपणे पाहिले असल्याची चर्चा आहे.

Rajesh Charpe

Chandrapur News: राज्यात सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकीचा धुमधडाका सुरू आहे. या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला सावकारांच्या त्रासामुळे कंबोडियात किडनी विकावी लागल्याचे प्रकरण समोर आले. मात्र, याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली नाही. गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) किडनी पीडितांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेताच पालकमंत्री अशोक उइके खडबळडून जागे झाले. तब्बल 25 दिवसानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. हे बघून नेत्यांना निवडणूक जास्त महत्त्वाची वाटते अशा प्रतिक्रिया उमटत आहे.

देशभरात हे प्रकरण गाजत असताना दोन्ही नेत्यांनी किडनी पीडित कुडे यांची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. मात्र, यात आता विरोधी पक्ष सक्रीय झाल्यानंतर कुडे यांच्यावरील अन्यायाची आठवण शासन आणि प्रशासनाला झाली. सावकारांच्या त्रासामुळे कंबोडियात किडनी विकावी लागली. याची तक्रार कुडे यांनी १६ डिसेंबरला दिली. याप्रकरणात सहा सावकरांना अटक करण्यात आले.

या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आले. त्यानंतर या किडनी रॅकेटची तार आंतराष्ट्रीय स्तरावर पोहचले असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणात सोलापुरातून रामकृष्ण सूंचू, पंजाबमधून हिंमाशू भारद्वाज याला अटक केली. या दोघांनी स्वतःची किडनी विकली आहे. ते एजंट पिडीत शोधायचे.

दिल्लीतील डॅा. रविंद्र सिंग आणि तामिळनाडूतील डॅा.राजरत्नम गोविंदस्वामी सध्या फरार आहे. या किडनी प्रकरणाची चर्चा देशभरात सुरु असताना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. उईके यांनी अत्यंत असंवेदशीलपणे या प्रकरणाकडे बघितल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

माध्यमांशी बोलतानाही त्यांना याप्रकरणाचे गांभीर्य वाटले नाही. दरम्यानच्या काळात माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात शेतकरी नेत्यांनी मिंथूर ते नागभीड लॅांगमार्च काढला होता. काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह कुडे यांनी काल गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका नेत्यांने तक्रार मागे घेण्यासाठी दबाब आणला होता. त्यासंदर्भातील पुरावे आपल्याकडे आहे, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनीही राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या मुद्दावरून धारेवर धरले. त्यानंतर पालकमंत्री उईके यांनी आपल्या जिल्ह्यातील किडनी विकणारा शेतकरी आठवला. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनाही कुडेंचा पुळका आला. या दोघांनी मिंथुर येथे जावून त्यांची भेट घेतली. निवडणुकीच्या आणि कामाच्या व्यस्ततेमुळे मी येऊ शकलो नाही, असे कारण पालकमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांना किडनी विकणाऱ्या त्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपेक्षा निवडणुका महत्वाच्या वाटल्या. त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मागील पंचेवीस दिवसांपासून या प्रकरणावर गप्प बसणारे या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया बोलते झाले. माझ्यामुळे रोशन प्रकरणात सहा सावकारांना अटक झाली. किडनी रॅकेट उघडकीस आले हे सरकारचे यश आहे. विरोधकांनी राजकारण करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT