Bacchu Kadu in Bhandara District Sarkarnama
विदर्भ

Bhandara Bacchu Kadu's Agitation : बच्चू कडू होऊ बघताहेत सनी देओल, काय आहे प्रकरण ?

अभिजीत घोरमारे

Bhandara Farmers News : दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाच्या धरतीवर प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पवनीतील तब्बल पाच ते सात हजार पीडित शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी वन विभागाच्या विरोधात उभे ठाकले. (Seven thousand aggrieved farmers stood against the forest department)

भंडारा जिल्ह्यात प्रहार जनशक्ती संघटनेच्या इतिहासात 'न भूतो न भविष्यति असे शेतकऱ्यांचे एक विराट आंदोलन काल (ता. २७) पवनी येथे उभे झाले. बैलबंडीवर उभे राहून नेतृत्व करणारे आमदार बच्चू कडू व त्यांच्या मागे हजारो शेतकऱ्यांचा समुदाय…, असे कालचे चित्र होते. याला केवळ एक आंदोलन म्हटले तर ते चुकीचे ठरेल. कारण काल झालेल्या या आंदोलनाने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शिंदे गटाचे आहेत आणि त्यांच्या या क्षेत्रात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सनी देओल बनत ‘गदर’ करून टाकला आहे. त्यामुळे या आंदोलनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता विद्यमान आमदार भोंडेकर यांना धडकी भरली आहे. ठाकरे गटानंतर आता प्रहार रूपात भोंडेकरांना प्रतिस्पर्धी मिळाल्याचे बोलले जात आहे.

शेतशिवारांत धुमाकूळ घातलेल्या जंगली रानडुकरांचा बंदोबस्त करून झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, या मागणीसाठी भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथे आमदार कडूंच्या नेतृत्वात वन विभागाच्या विरोधात एल्गार पुकारला. पीडित शेतकऱ्यांनी लॉँग मार्च काढत वन विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. वन्यप्राण्यांचा त्रास दरवर्षीचाच झाला आहे. पण वन विभागाने अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना न केल्याने काल शेतकऱ्यांच्या उद्रेक पाहायला मिळाला.

रानडुकरांचा बंदोबस्त करावा, हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, या प्रमुख मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. यात विशेष बाब अशी की, हे आन्दोलन शेतकऱ्यांचे होते. याचे कारण असे की, आंदोलनात सहभागी झालेला प्रत्येक शेतकरी सोबत एक शेर तांदूळ व १० रुपये घेऊन आला होता.

स्वाभिमानी शेतकऱ्यांनी स्वतःचा खर्च स्वतः केला. त्यामुळे आंदोलनात पैसे देऊन कुणाला आणण्याचा प्रश्‍नच राहिला नाही. त्यामुळे हे आंदोलन दिल्लीच्या धरतीवर करण्यात आले, असे म्हणता येईल. आता आपल्या विधानसभा क्षेत्रात इतके मोठे आंदोलन झालेले पाहून आमदार भोंडेकरांना धडकी भरणे साहजिक आहे.

पंचभाई बच्चू कडूंच्या 'गुड बुक'मध्ये !

आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जरी हे आंदोलन झाले असले, तरी हे आंदोलन सफल करण्याचे श्रेय प्रहार सेवक किशोर पंचभाई यांना देण्यात येत आहे. गेल्या आठवड्याभरापासून हे आंदोलन कसे यशस्वी होईल, यासाठी त्यांनी भरपूर परिश्रम घेतले. त्याचा सफल परिणाम बच्चू कडूंना पाहायला मिळाला. जिल्ह्याच्या प्रहारच्या इतिहासात एकीकडे येवढे मोठे आंदोलन झाले नाही.

प्रहारचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी व आंदोलनात ऐन वेळेवर येणाऱ्या रामटेकच्या एका आयात केलेल्या नेत्याला आजवर असे आंदोलन उभे करता आहे नाही. असे असताना प्रहारमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या किशोर पंचभाई यांनी हे आंदोलन उभे करत जिल्ह्यात प्रहारची ताकद दाखवून दिली. किशोर पंचभाई यांचा समावेश बच्चू कडूंच्या ‘गुड बुक’मध्ये झाला. पंचभाईंच्या रूपाने विद्यमान आमदारांना प्रतिस्पर्धी मिळाल्याचे बोलले जात आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT