Bacchu Kadu News: बच्चू कडूंच्या निशाण्यावर शिंदे-फडणवीस; 'मी सत्तेत जरी असलो तरीही सरकारची ही चूक...'

Maharashtra Politics : प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री असणे गरजेचे...
eknath shinde,devendra fadnavis, Bacchu Kadu
eknath shinde,devendra fadnavis, Bacchu Kadu Sarkarnama
Published on
Updated on

Bhandara : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री असावा, अशी मागणी होत असताना शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील आमदार बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिला. बच्चू कडूंनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही त्यांनी टीका केली.

"सहा-सहा जिल्ह्यांसाठी एक पालकमंत्री असून, प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री असणे गरजेचे आहे. पालकमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करायला हवी होती," अशी बोचरी टीका बच्चू कडू यांनी नाव न घेता फडणवीसांवर केली. "मी सत्तेत जरी असलो तरी ही सरकारची चूकआहे," असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत.

eknath shinde,devendra fadnavis, Bacchu Kadu
Pratap Patil Chikhlikar News : अंबादास दानवेंनी वायफळ बडबड करू नये; खासदार प्रताप पाटील चिखलीकर संतापले...

नेता आमचा बाप नाही...

भंडाऱ्यात वन विभागाकडून शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाच्या विरोधात प्रहार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बच्चू कडूंनी संवाद साधला. "आम्ही सत्तेत जरी असलो तरी शेतकरी आहोत आणि विरोधात असलो तरीही शेतकरी आहोत. शेतकरी आमचा बाप आहे. नेता आमचा बाप नाही," असा टोला बच्चू कडू यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांची जंगली प्राण्यांनी नासधूस केली आहे. वन्य प्राण्यांचे मानवावर हल्ले वाढले असून, शेतीच्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत, त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वन विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

अधिकाऱ्यांना इशारा...

"मी शेतकऱ्यांचा पोरगा आहे. शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही तर वन अधिकाऱ्यांचे हातपाय तोडू, माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत. चार वर्षांची शिक्षादेखील सुनावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात हात टाकला तर तुमचा हातदेखील छाटू," असा इशाराच बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

Edited By : Mangesh Mahale

eknath shinde,devendra fadnavis, Bacchu Kadu
Pankaja Munde News: निर्णय घेण्याच्या तयारीत असलेल्या पंकजाताईंना राष्ट्रवादीकडून पुन्हा ऑफर; तर त्यांचं स्वागत करू...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com