Bhandara Food Grain Scam Case Sarkarnama
विदर्भ

Bhandara Food Grain Scam Case: धान घोटाळ्यात सात जणांना अटक; आरोपींमध्ये अजितदादांच्या आमदाराच्या भावाचा समावेश

Mangesh Mahale

भंडारा जिल्ह्यातील सहा राईस मिलमध्ये साडेबारा कोटी रुपयांच्या धान खरेदी अपहार झाल्याचे सीआयडीच्या तपास आढळले आहे. सीआयडीने सहा आरोपींना अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. आरोपींमध्ये अजितदादांच्या (Ajit Pawar) आमदाराच्या भावाचा समावेश

तुमसरचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore)यांचा भाऊ विश्वनाथ कारेमोरे (४३) रा. वरठी याला उशीरा अटक करण्यात आली. राजू कारेमोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आहेत. विश्वनाथ कारेमोरे हे मोहाडी तालुक्यातील एकलारी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत.न्यायालयाने त्यांचे जामीन फेटाळल्याने त्यांची तुरूंगात रवानगी करण्यात आली.

महेश कहाळकर (३५) रा. बाम्हणी ता. तुमसर जि. भंडारा, सुरेंद्र वहीले (५१) रा. माढळ ता. तुमसर जि. भंडारा, ताराचंद काहालकर (६५) रा. बाम्हणी ता. तुमसर जि. भंडारा, भारत ठाकरे (५८) रा. श्रीरामनर ता. तुमसर जि. भंडारा, रामलाल बांडेबुचे (५५) रा. सुकळी ता. तुमसर जि. भंडारा, माणिक बोदरे (६५), रा. ढोरवाडा ता. तुमसर जि. भंडारा, असे आरोपींचे नावे आहेत.

उर्वरीत एका आरोपीला उशीरा अटक झाल्याने त्याला न्यायालयात हजर करता आले नाही.या प्रकरणात सीबीआयच्या तपासात 12.50 कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचं आढळले आहे. त्यानंतर याप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे.

आधारभूत खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केल्याचं कागदोपत्री दाखवून सरकारला तांदूळ परत न दिल्याचं आणि शेतकऱ्यांचे खोटे सातबारा आणि खोटी बिलं जोडून अपहार केल्याचं हे प्रकरण आहे.

तत्कालीन जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी 2018 मध्ये याप्रकरणी सीआयडीकडं तक्रार केली होती. त्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघड झाला.

हा घोटाळा 12.50 कोटी रुपयांचा आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काही राईस मिल चालकांनी 8.50 कोटी रुपयांचा धान सरकारकडं जमा केले आहे. यात मोहाडी तालुक्यातील सहा राईस मिलचा समावेश आहे. या कारवाईमुळे मोहाडी, तुमसर आणि भंडारा तालुक्यातील अनेक खरेदी केंद्रही अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT