Chandrashekhar Bawankule News  Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule News : बावनकुळे साहेब धाब्यावर या ना! तारीख ठरली, खासदार मेंढेंना दिले निमंत्रण...

Journalists invites bawankule : बावनकुळेंना अपेक्षित पाण्याचीही व्यवस्था केली आहे.

Mangesh Mahale

Bhandara : 'पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या', असा सल्ला पदाधिकाऱ्यांना देणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ऋण फेडण्यासाठी पत्रकारांनी त्यांना निमंत्रण दिले आहे. भंडाऱ्यातील पत्रकारांनी खासदार सुनील मेंढे यांच्या घरी जाऊन खासदारांच्या माध्यमातून बावनकुळे यांना भंडाऱ्यात जेवणासाठी निमंत्रण पत्रिका दिली आहे.

या निमंत्रण पत्रिकेत चहा आणि जेवणाची व्यवस्था केलेली असून, जेवणात बावनकुळे यांच्या आवडीनुसार मेन्यू राहील तसेच त्यांना अपेक्षित पाण्याचीही व्यवस्था केली असल्याचे नमूद केले आहे. जेवणाचे संपूर्ण बिल देण्यासाठी पत्रकार सक्षम असल्याचेही यात नमूद केले आहे. बावनकुळेंना भंडाऱ्यात एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता साईकृपा ढाबा, कवडशी फाटा, नागपूर रोड शहापूर येथील धाब्यावर जेवणासाठी निमंत्रण दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या, अशी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा छत्रपती संभाजीनगरातील पत्रकारांच्या वतीने अनोख्या पद्धतीने समाचार घेण्यात आला. बावनकुळे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमसाठी छत्रपती संभाजीनगरात विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

काय म्हणाले होते बावनकुळे...

अहमदनगर येथे रविवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल दिलेल्या ‘कानमंत्रा’ची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. "ज्या बूथवर तुम्ही काम कराल, तेथील पत्रकारांची यादी तयार करा, महाविजय 2024पर्यंत आपल्याविरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या. या पत्रकारांना महिन्यातून धाब्यावर न्या, एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे हे समजले असेल," असा सल्ला बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT