Arvind Kejriwal News : केजरीवाल-मोदींमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; म्हणाले, 'चौथी पास राजाकडून काय अपेक्षा ठेवणार?

Arvind Kejriwal Challenge PM Modi : चौथी पास राजाला माझं एक आव्हान आहे जर मागच्या वेळप्रमाणे यावेळीही काहीही निष्पन्न झालं नाही, तर ...
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal News Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीवरून वाद सुरूच आहे. यातच आता पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर शिक्षणावरून जहरी टीका केली आहे. दिल्लीतल्या मुख्यमंत्री निवासस्थानाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CBI) चौकशी सुरू आहे. चौकशीवरून विरोधकांनी केजरीवालांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. केजरीवालांनीही त्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

केजरीवाल म्हणाले, "या चौकशीतूनही काहीच निष्पन्न होणार नाही. यापूर्वीही चौकशी झालीय त्यात काहीही मिळालं नाही आत्ताही काही मिळणार नाही. चौथी पास राजाकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवणार? चोवीस तास हे फक्त चौकशीचा खेळ खेळतात किंवा भाषणं करतात. यांना इतर काही कामं नाहीत,"

Arvind Kejriwal News
Chhagan Bhujbal News : जेलमध्ये असताना भुजबळ करत होते पवारांना ब्लॅकमेल; जामिनावर सुटलेल्या माजी आमदार रमेश कदमांचा गौप्यस्फोट

"पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, सीबीआयमार्फत अशा प्रकारे चौकशी होणं हे पंतप्रधान मोदींची भीती दर्शवणारं आहे, विरोधकांनी केजरीवाल सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मोदींनी आता नवी चौकशी सुरू केली आहे. चौकशीचं मी स्वागत करतो. चौथी पास राजाला माझं एक आव्हान आहे, जर मागच्या वेळप्रमाणे यावेळीही काहीही निष्पन्न झालं नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? असे थेट आव्हान केजरीवालांनी मोदींना दिलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीवरून वाद सुरू आहे. मोदींच्या पदवीची विचारणा केल्यामुळे न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना २५ हजारांचा दंड ठोठावला. त्यानंतर राजकीय नेत्यांकडून यावर टीका करत मोदी यांच्या पदवीवर संशय व्यक्त केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत मोदींच्या पदवीची माहिती मागवली होती. पण विद्यापीठाने नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती देण्यास नकार दिला. याउलट गुजरातमधील न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांनाच २५ हजारांचा दंड ठोठावला.

Edited By : Mangesh Mahale

Arvind Kejriwal News
Ganesh Visarjan 2023 : राजकीय नेत्यांच्या कमानी बाप्पांच्या मार्गात ठरताहेत 'विघ्न'; मनसेकडून व्हिडिओ व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com