Sunetra Pawar Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Politics : राष्ट्रवादीला मोठा झटका! 'एका' निर्णयामुळे दोन बड्या नेत्यांना सोडावी लागली महत्वाची पदे

Bhandara Politics : भंडाऱ्यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसला असून एकाच वेळी दोन बड्या नेत्यांना आपली पदे सोडावी लागली आहेत.

Aslam Shanedivan

Bhandara Political News : राज्यात एकीकडे पक्षातील खासदार गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. तर बैठकीला आमदारांनी दांडी मारल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. या राजकीय घटनांची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत असतानाच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना देखील मोठा राजकीय झटका बसला आहे. भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला असून मोहाडी पंचायत समितीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सभापती आणि उपसभापती या दोघांविरोधात अविश्वास ठराव बहुमताने पारित झाला आहे. या धक्कादायक निकालामुळे राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरूगं लागल्याची चर्चा सुरू झाली असून दोन्ही पदाधिकाऱ्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

साम टीव्हीच्या वेब पोर्टलवर आलेल्या वृत्तानुसार भंडारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात राजकीय भूकंप झाला असून मोहाडी पंचायत समितीमध्ये सत्ताधारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. येथे राष्ट्रवादीच्या सभापती आणि उपसभापती या दोघांविरोधात अविश्वास ठराव तब्बल १० विरुद्ध २ अशा स्पष्ट बहुमताने पारित झाला आहे.

यामुळे सभापती जगदीश शेंडे आणि उपसभापती रेवानंद ऊर्फ देवा चकोले हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खंदे पदाधिकारी मानले जातात. तसेच ते तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांचे हे अत्यंत निकटवर्तीय देखील मानले जातात.

मात्र अविश्वास ठराव बहुमताने पारित झाल्याने दोन्ही नेत्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर कट्टर समर्थकांना अशा प्रकारे पद गमवावे लागल्याने आमदार राजू कारेमोरे यांच्यासाठी धोक्याची हंटा वाजल्याचे असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान मोहाडी पंचायत समितीच्या एकूण १२ सदस्यांपैकी तब्बल १० सदस्यांनी सभापती आणि उपसभापतींच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला होता. तसेच हे दोन्ही पदाधिकारी इतर सदस्यांना विश्वासात न घेता केवळ आपल्या मनमर्जीने विकासकामे आणि प्रशासकीय निर्णय घेतात असा आरोप देखील इतर सदस्यांनी केला होता.

याच १० सदस्यांनी नाराजीतून एकत्र येत दोन्ही पदाधिकाऱ्यांविरधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. अखेर झालेल्या मतदानात सभापती आणि उपसभापतींच्या बाजूने केवळ २ मते पडली. यामुळे मोहाडी पंचायत समितीत आता मोठी उलथापालथ झाली असून राष्ट्रवादीच्या सभापती जगदीश शेंडे आणि उपसभापती रेवानंद ऊर्फ देवा चकोले यांना पायउतार व्हावं लागलं आहे.

या राजकीय घडामोडीमुळे भंडारा जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला वेगळे वळण आले असून १० सदस्यांचा गट कोणती भूमिका घेतो? पंचायत समितीवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT