Sunetra Pawar Baramati hospital News : सुनेत्रा पवारांच्या एका दौऱ्यानंतर अधिकाऱ्यांची उडाली झोप! बारामती रुग्णालयाच्या अधिष्ठात्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

Baramati government hospital administration : सुनेत्रा पवार यांच्या बारामती रुग्णालय दौऱ्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. अधिष्ठात्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तातडीच्या बदल्यांची चर्चा सुरू.
NCP leaders hold discussions over Rajya Sabha candidature amid speculation surrounding a former Shiv Sena UBT MP.
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकिय रुग्णालयाच्या अस्वच्छ आणि ढिसाळ कारभारावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी झाडाझडती घेत कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावल्याची घटना ताजी असतानाच, आता या प्रकरणात राज्य शासनाने अत्यंत मोठी आणि कडक कारवाई केली आहे. या रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट बदली करण्यात आली असून तसा अधिकृत आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने २३ जून २०२१ रोजी जारी केला आहे. सुनेत्रा पवार यांच्या 'दादा स्टाईल' अचानक भेटीनंतर अवघ्या काही दिवसांतच झालेल्या या धडक कारवाईची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती दौऱ्यावर असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बारामती शासकीय रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी वॉर्डमधील ढिसाळ कारभार, कपाटांची झालेली दुरवस्था आणि जागोजागी पसरलेली अस्वच्छता पाहून सुनेत्रा पवार यांचा पारा चांगलाच चढला होता. "दिवसभर काय करता तुम्ही? फक्त मोबाईलवर असता?" अशा कडक शब्दांत त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करत नावांची नोंद करण्याचे आदेश दिले होते. या घटनेनंतर रुग्णालयातील निष्काळजीपणा राज्य शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे आता समोर आलेल्या अधिकृत आदेशावरून स्पष्ट होत आहे.

NCP leaders hold discussions over Rajya Sabha candidature amid speculation surrounding a former Shiv Sena UBT MP.
Lohagad Murder Case: महाबळेश्वरला वाढदिवस, पण त्या आधीच होणाऱ्या नवऱ्याला बॉयफ्रेंडच्या मदतीनं संपवलं! दोघांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील प्रशासकीय कारभारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासकीय कारणास्तव तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच बारामती येथील शल्यचिकित्साशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. मंजुषा लिटके यांचीही पुणे येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये बदली करण्यात आली आहे.

याशिवाय रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली आहे. बारामती रुग्णालयाची रिक्त झालेली अधिष्ठाता पदाची धुरा आता बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील शल्यचिकित्साशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. किरणकुमार जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांची बारामती येथे बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

NCP leaders hold discussions over Rajya Sabha candidature amid speculation surrounding a former Shiv Sena UBT MP.
Top 10 News : ओम राजेनिंबाळकरांचं बंड महिनाभरापासून.., TET नियमात बदल हिजाब वादावर पडदा, पुन्हा सनद रद्द होईल.., यासह वाचा Top Ten घडामोडी...

सुनेत्रा पवार यांच्या अचानक भेटी दरम्यान रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी अनेक अडचणी मांडल्या होत्या, तसेच आरोग्य सेवेतील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर थेट उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवरच ही बदलीची कुऱ्हाड कोसळल्याने, शासकीय कामात आणि आरोग्य सेवेत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असाच कडक संदेश या निमित्ताने राज्य शासनाने अनुषंगाने सुनेत्रा पवार यांनी दिला आहे. सुनेत्रा पवार यांच्या या भेटीमुळे आणि त्यानंतर झालेल्या या धडक निर्णयामुळे बारामतीकरांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच कडक कार्यशैलीची आणि धडाकेबाज निर्णयांची आठवण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com