Bhandara OBC Sarkarnama
विदर्भ

Bhandara OBC News : पितृपक्षात ओबीसी करणार नाहीत पूजा विधी, कारण...

अभिजीत घोरमारे

Bhandara District Political News : काल २९ सप्टेंबरपासून पितृपक्ष - पितृ पंधरवडा सुरू झाला आहे. या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, महालय आदी विधी केले जातात. मात्र, ही पूजा विधी भंडारा ओबीसी क्रांती मोर्चा करणार नसल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केली. (What is the point of worshiping if our 'fathers' cannot be calmed down?)

जेथे आपले ‘पितर’च शांत होऊ शकणार नसतील, तर पूजा करण्यात अर्थ काय, असा प्रश्‍न ओबीसींना पडला आहे. त्यामुळे सर्व ओबीसी समाजाने ही पूजा करू नये, असेही मत त्यांनी मांडले आहे. यासाठी त्यांनी फार मोठे कारण दिले आहे. अनंत चतुर्दशी पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष सुरू होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावास्येपर्यंतच्या काळाला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हणतात.

यंदा पितृपक्ष २९ सप्टेंबरपासून १४ ऑक्टोबर या कालावधीत आहे. या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, महालय आदी विधी केले जातात. पितृपक्षात केलेल्या तर्पणामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कायम सुख-शांती नांदते, असे मानले जाते. आता खरा मुद्दा असा आहे की, पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा विधी केला जातो.

आमच्या मृत पितरांचा, मृत वाडवडिलांचा जीव त्यांच्या नातू-नातवांत आहे.आज सरकारची भूमिका ओबीसी विरोधी आहे. जातिनिहाय जनगणना केली जात नसल्याने ओबीसीची खरी ‘संख्या’ कळत नाही. त्यामुळे इतर समाजाच्या तुलनेत ओबीसी समाजावर अन्याय अधिक आहे. त्यातही सरकारने ओबीसी प्रवर्गात इतर जातींची ‘मेगाभरती’ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

दुसरीकडे ओबीसी विद्यार्थ्यांवर म्हणजेच आमच्या पितरांच्या ओबीसी नातवंडांवर अन्याय सुरू आहे. घोषणा केली पण वसतिगृह अद्याप बांधले गेले नाही, शैक्षणिक मदतही तोकडी आहे, पुढील उच्च शिक्षणासाठी मदत नाही, नोकरीसाठी रिक्त जागाच नाही, या सर्व अन्यायामुळे आमचे ओबीसी विद्यार्थी सतत ताण तणावात जगत आहेत. ओबीसी नातवांची ही सर्व स्थिती आमचे पितर जाणून आहेत.

पितरांना शांत करण्याचा आम्ही कितीही प्रयत्न केला, पूजा विधी केले, श्राद्ध घातले तरी कावळा पिंडीला शिवणार नाही, अशी परिस्थिती आमची झाली आहे. दरम्यान, आमच्या ओबीसी बांधवाची पूजा आमचे पितर स्वीकारच करणार नाहीत. त्यामुळे ही पितृपक्षाची पूजा आम्ही करणार नसल्याची घोषणा संजय मते यांनी केली आहे. पितृ पक्षात आम्हा ओबीसींना फार मोठा प्रश्न पडला असल्याचे संजय मते यांचे म्हणणे आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT