Bharat gogawale on Ministership : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. त्यामुळे इच्छुक आमदारांची कोंडी होतेय. त्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत फुटलेल्या 40 आमदारांमधील भारत गोगावले यांचे नाव आघाडीवर आहे. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये असलेल्या भरत गोगावलेंना पत्रकारांनी मंत्रीपद कधी मिळणार, याबाबत छेडले असता मंत्रीपदाच्या बातम्या तुमच्या माध्यमातून समजतात. अशा बातम्या ऐकल्या की मनात लाडू फुटतात, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली.
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या युतीमुळे भरत गोगावले यांना मंत्रीपद नक्की मिळणार, अशी हवा होती. मात्र, पुढे अजित पवार या युतीत सहभागी झाले. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवार गटातील आमदारांना मंत्रीपद मिळाले. तर, शिंदे गटातील आमदारांची मात्र निराशा झाली. त्यावेळी आपण मंत्रीपदासाठी कोट शिऊन ठेवल्याचे वक्तव्य भारत गोगवले यांनी केले होते.
काही दिवसांपुर्वी भरत गोगावले यांनी आपण मंत्रीपदासाठी आत्ता देवालाच कौल लावला असल्याचे सांगितले होते. मंत्रीपद मिळण्यास अडचण असेल तर देवच दूर करेल, असे भारत गोगवले म्हणाले होते. फक्त मंत्रीपदासाठी आपण आडून बसलेलो नाहीत. लोक माझ्याकडे काम घेऊन येतात. त्यांचे काम करून देण्यास माझे प्राधान्य असते, असे गोगावले म्हणाले होते.
भरत गोगावलेच नाहीत तर शिंदे गटातील अनेक आमदारांचे मंत्रीपद कधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने अनेकांना आपल्या महत्वकांक्षांना आळा घालावा लागला आहे. फारच कमी आमदार आपली मंत्री पदाबाबत असलेली इच्छा उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. मात्र, भारत गोगवले हे आपल्याला मंत्रीपद नक्की मिळणार यावर ठाम आहेत.
कांदा प्रश्नावर विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आंदोलनाची भारत गोगावले यांनी खिल्ली उडवली. विरोधकांना काही कामधंदा नसल्याचे ते म्हणाले. सरकारच्या धोरणावर शेतकरी खुष आहे. विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने ते केवळ आंदोलन करत असल्याचेही भरत गोगावले म्हणाले.
Edited by Roshan More
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.