Maharashtra News : देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि देशात आघाडीवर असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. संपूर्ण देशात औद्योगिक विकास आणि प्रगतीवर असलेल्या महाराष्ट्रात काय चालले आहे? असा मोठा प्रश्न उपस्थित करणारा एक अहवाल समोर आला आहे. हा अहवाल आहे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा म्हणेच NCRBचा. एनसीआरबीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रगतीशील असलेला आपला महाराष्ट्र देशात दंगलींच्या घटनांमध्ये अव्वल असल्याचे NCRBच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
महाराष्ट्रा गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये फक्त दंगलीचे 8 हजार 218 गुन्हे नोंदवले गेले आहेत. या आकडेवारीनुसार देशात 2022 मध्ये सर्वाधिक दंगलीच्या घटना या महाराष्ट्रात घडल्याचे समोर आले आहे. विकासात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने दंगलीच्या घटनांमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशलाही मागे टाकले आहे. महाराष्ट्रनंतर दुसऱ्या क्रमांकावर बिहार आणि तिसऱ्या क्रामांकावर उत्तर प्रदेश आहे. दोन्ही राज्यांमध्ये दंगलीच्या जवळपास 5000 घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या 8,218 दंगली झाल्या. यात 9,558 नागरीकांना दंगलीचा फटका बसला.
महाराष्ट्रात गेल्या वर्षी दंगलीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दंगलीच्या या घटनांमध्ये कलम 147, 151 नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दंगलीच्या घटनांममध्ये 28 प्रकरणे जातीय-धार्मिक, 25 जातीशी संबंधित आणि 75 प्रकरणे ही राजकीय मुद्द्यांशी संबंधित होते, अशी आकडेवारी NCRBने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.