Atul Londhe at Akola Sarkarnama
विदर्भ

भारत जोडो यात्रेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, त्यांना पश्चाताप करावा लागेल...

राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी (Atul londhe) केला.

Atul Mehere

अकोला : राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी (Atul Londhe) केला. अकोल्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या पूर्व पाहणी दौऱ्यावर आले असता स्थानिक शासकिय विश्राम गृह येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना बोलत होते. ह्या वेळी त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, डॅा सुधिर ढोणे, जि.प.सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, प्रदेश सचिव प्रशांत गावंडे, युवक जिल्हाध्यक्ष आकाश कवडे उपस्थीत होते.

पुढे बोलतांना ही यात्रा काही निवडक ठिकाणांवरच जाणार असा आरोप करणार्यांनी भारताच्या भूगोलाचा अभ्यास करावा, असा चिमटा भाजपला (BJP) घेतलाय. तसेच राहूल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत यात्रेवर टिका करणाऱ्यांना एक दिवस पश्चाताप करावा लागेल. असेही ते म्हणाले. टी-शर्ट घालतोय, लहान मुलं येऊन भेटत असल्याच्या एनसीपीसीआर मध्ये तक्रारी केल्या. बर झालं एनसीपीसीआर नेहरूजींच्या काळात नव्हते. कारण त्यावेळी छोटी मुलं त्यांना चाचा नेहरू म्हणायचे आणि आजूबाजूला राहायचे, अन् त्यांच्यासाठी गुलाबाचे फुल घालायचे. एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) देशाचे राष्ट्रपती होऊन गेलेत मिसाईल मॅन आपण म्हणून त्यांना ओळखतो.

सातत्याने ते तीस ते चाळीस हजार लहान मुले जमा होवून त्यांच्यासोबत बोलायचे. दरम्यान, आता लहान मुलं येतात राहुल गांधी यांची पप्पी घेताहेत, कोणी हात मिळतोय, कुणी गळाभेट घेतोय, कुणी सोबत चालतं, कुणी रडत तर कुणी आपल्या व्यथा मांडतात. याच्यासुध्दा भाजपने तक्रारी केल्यात. एवढेच नव्हे तर कर्नाटकमध्ये बॅनर फाड़ण्यात आले. मात्र तरीही काँग्रेसच्या एकाही नेत्याने एफआयआर नोंदवला नाही. त्यामुळे त्यांना जेवढं वाईट करता येईल तेवढं करू द्या. आपण जेवढं चांगलं करता येईल तेवढं करू. याचा त्यांना एक दिवस पश्चाताप वाटेल, असे स्पष्टच मत लोंढेंनी व्यक्त केले.

भारत जोडो यात्रेला गालबोट लावण्याचा अनेकदा प्रयत्न..

भारत जोड़ो यात्रेला दुसर काहीतरी वळण द्यावं, म्हणून हिमाचल, गुजरातमध्ये निवडणूका आहेत, तर तिथून ही यात्रा का जात नाहीये. एखाद्या राज्यात यात्रा २१ दिवस तर कुठल्या राज्यात चार दिवसच. तर मला त्यांना त्यांचे बालपण बालवाडीचे दिवस आठवून द्यायचे. प्राथमिक शाळेचे दिवस आठवून द्यायचे. कदाचित भारताचा नकाशाचा अभ्यास आपण केला, पण आता विसरले असणार. कारण आपल्याला आता फक्त लढवता, भिडवता अन् द्वेष निर्माण करता येत, एवढंच ८ वर्षात शिकले. त्यामुळे आता भारताच्या एवढ्या मोठ्या उपखंडामध्ये चालायचं म्हटलं म्हणजे इकडे निवडणूका आहे, म्हणून तिकडे गेल. तिकडे निवडणुका म्हणून तिकडे गेलो तर ही यात्रा कधीच संपणार नाहीये.

भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत, हा भारत जोडोचा संदेश आहे. अन् आता सरळ जरी चालत असलो तर त्याचे पडसाद सर्वीकडे पडत आहेत. अनेक लोक स्वतःहून यात्रेत सहभागी होताहेत. ही देशाची गरज आहे, हे लोकांनाही समजले. त्यामुळे ही यात्रा इकडे तिकडे कुठेही नेता येत नाहीये, त्यासाठी सरळच जाव लागेल. सरळ गेल्यामूळे थोडाफार लोकांचा भूगोलाचा अभ्यास होईल. म्हणून भारत तोडो वाल्यांनी थोडोफार भूगोलाचा अभ्यास करावा. म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी भारत जोडो यात्रेला गालबोट लावू शकणार नाहीये. असा चिमटा भाजपला घेतलाय.

तसेच पुढे बोलताना म्हणाले की यापूर्वी अनेकदा बलिदान देऊनही यशस्वी झालोय. यापुढेही काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता देशाच्या एकात्मतेसाठी सर्वोच्च बलिदानासाठी तयार आहे. या देशाचे संविधान आम्ही जपलेलं आहे आणि देशाच्या तिरंगामध्ये स्वतंत्रपूर्वी लपेटून गेलो. पुढे म्हणाले, आता उगाच प्रश्न निर्माण करू नये, स्वतंत्रपूर्वी तिरंगा होता का? तर तुम्हाला त्यामध्ये चरखा दिसेल आणि तिरंगाही दिसेल. अशोक चक्र हे स्वतंत्र्यानंतर आलंय. इतिहासाची जाण पण करून देणे गरजेचे आहे. कारण देशाचे दोन प्रधानमंत्री तिरंगामध्ये लपेटून गेलेले आहेत. पण तेच धोक्यात आलेलं आहे. ते वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू असल्याचे लोंढे म्हणाले.

आंबेडकर यात्रेत प्रत्यक्ष सहभागी नाही झाले तर...-

प्रकाश आंबेडकरांना देखील भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावंच लागेल. प्रत्यक्ष नाही झाले तर ते मनातून सहभागी होतील. कारण ही यात्रा संविधान वाचवण्याची पण आहे. ही यात्रा काँग्रेसची नव्हे तर तिरंग्याची आहे. त्यामुळे ही यात्रा आंबेडकरांचीसुद्धा आहे. दरम्यान आंबेडकर जर यात्रेमध्ये सहभागी नाही होणार, संविधान वाचवायचं आहे, देशाचा तिरंगा वाचवायचा आहे. देशात महागाई बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ते यात्रेत प्रत्यक्ष सहभागी जरी होऊ शकले नाही तर मनाने नक्कीच सहभागी आहेत. हा विश्वास लोंढे ह्यांनी व्यक्त केला. दरम्यान, ५० खोक्यात काही सत्ता ओके होत नसते. जनतेपेक्षा मी मोठा असं समजणारा एक तर स्वप्रेमात असेल किंवा वेडा असेल, असेही लोंढे म्हणालेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT