Sitakka
Sitakka  sarkarnama
विदर्भ

Bharat Jodo Yatra : नक्षली विचार ते आमदार; भारत जोडो यात्रेतल्या सीताक्काची कहाणी!

सरकारनामा ब्यूरो

शेगाव : घरची परिस्थिती आणि नक्षल्यावाद्यांचा प्रभाव यातून पती आणि भावांनी नक्षल्यांशी संबंध आला. त्यामुळे नक्षली म्हणून स्वतःलाही मी त्यात झोकून दिले. मात्र, मनात गांधीवादी विचार असल्याने, नक्षलवाद सोडून गांधीवादासोबत जात आमदारकी मिळविली. ही कहाणी वारांगल मुलूगु येथील सीताक्का यांची.

वयाच्या १५ व्या वर्षी वारांगल मुलूगु येथील सीताक्का या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे नक्षली कारवाईत सहभागी झाले. तब्बल १० ते १५ वर्ष त्यांनी सक्रीयतेने काम केले. त्यांचे पती आणि भाऊही त्यात सहभागी होते. यादरम्यान त्यांना मुलेही झाली. त्यांची जबाबदारी आणि योग्य शिक्षण आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी नक्षलवाद सोडून नियमित जीवन जगण्याचा निर्धार केला.

यानंतर मात्र त्यांनी नक्षल्यांशी संबंध तोडून, गांधीवादाशी ज्योत मनात ठेवली. नक्षलींमधून त्या बाहेर पडल्या. त्यानंतर तेलगू देसम पक्षाकडून निवडणूक लढवली. पण येथेही ते फार काळ रमल्या नाही. यानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वारांगल मुलूगु येथून निवडणूक लढवित ते विजयीदेखील झाले.

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेत तेलंगाणा येथून ते सहभागी झाल्यात. दररोज त्यांच्यासोबत दररोज पदयात्रा करतात. भारत जोडोच्या माध्यमातून खरोखरच समाज परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT