Satara : माझा डोंगुर कुठं गेलाय, मलाच कळेना... शहाजीबापू पाटील

मी गुवाहाटीला Guwahati गेल्यामुळे जगात World पोहचलोय. मित्रांनो काळजाच्या अंतःकरणातुन गर्भातुन निघालेला कोणताही आवाज असो, काम असो, नजर असो ती भगवंतापर्यत पोहचतेच.
Shahajibapu Patil
Shahajibapu Patilsarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : झाडानं, डोंगरानं, मी कुणीकडे गेलोय हे मलाच कळेना झालया. मला अमेरिका, मलेशिया, थायलंड, जपान, श्रीलंकेतुन फोन यायला लागल्यात. माझा डोंगुर कुठ गेलाय, मलाच काय कळना झालंय, अशी मिश्किल टिपण्णी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंच्या वाढदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शहाजीबापू म्हणाले, मी गुवाहाटीला गेलो नसतो तर लोकांनी आज मला टाळीसुध्दा वाजवली नसती. मात्र, मी गुवाहाटीला गेल्यामुळे जगात पोहचलोय. मित्रांनो काळजाच्या अंतःकरणातुन गर्भातुन निघालेला कोणताही आवाज असो, काम असो, नजर असो ती भगवंतापर्यत पोहचतेच. पंढरपुरातील तनपुरे महाराजांच्या मठात हत्तीचा पाय मगरीच्या जबड्यात दाखवला आहे.

हत्तीच्या सोंडेत कमळाचे फुल दाखवले आहे. हत्तीला मगरीपासुन वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र फेकुन मारतो आणि मगर मरते. हा प्रचंड मोठा पुतळा मठात आहे. त्यावेळी हत्तीने कोणती प्रार्थना, आरती केली होती का, एका हत्तीसाठी जर भगवन श्रीकृष्ण येत असेल तर आपल्यासाठी भगवंत का येणार नाही.

Shahajibapu Patil
शहाजीबापू पाटलांना घेरण्याची उद्धव ठाकरेंची रणनीती : कट्टर विरोधकास पाठबळ!

माझ्या २० वर्षाच्या राजकारणाच्या वेदना, दुःख मी माझ्या एका मित्राला फोनवरुन बोलवुन दाखवल्या. ती वास्तवता जगाने, मराठी माणसाने स्विकारली. माझी माणदेशी गावरान भाषा जगाला आवडली. झाडानं, डोंगरानं, मी कुणीकडे गेलोय हे मलाच कळेना झालया. अमेरिका, मलेशिया, थायलंड, जपान, श्रीलंकेतुन फोन येतो. माझा डोंगुर कुठ गेलाय, आता मलाच काय कळेना झालयं.

Shahajibapu Patil
Patan : शंभूराज देसाई भडकले; म्हणाले, कोत्या मनाच्या लोकांना ते आवडले नसावे

शहाजीबापुंचा डायलॉग...टाळ्या, शिट्य्या

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, समदं काय ओकेच. शंभुराज मंत्री, ओके..., एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके... शिंदे फडणवीसांचे सरकार.. ओकेच, असा डायलॉग मारताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्यांचा कडकडाट केला.

Shahajibapu Patil
Shahaji Patil : अडीचशे मतंही मिळत नाहीत त्यांच्याबद्दल कशाला विचारता ? असं कुणाबद्दल म्हणाले शहाजीबापू !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com