RTE admission bribery case Sarkarnama
विदर्भ

RTE admission bribery case : RTE प्रवेशासाठी ‘रेटकार्ड’! 50 हजारांची लाच मागणारे दोन कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

Amravati ACB officials caught centre head and contractual employee red-handed while allegedly accepting Rs 50,000 bribe facilitating RTE admission process : RTE प्रवेशासाठी लाच मागण्याचा प्रकार अमरावती इथं समोर आला असून, यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर कारवाई केली जात आहे.

Pradeep Pendhare

Amravati bribery arrest : राज्यभरात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आरटीई ही पूर्णपणे मोफत आणि ऑनलाइन प्रक्रिया असते. पण यामार्फत प्रवेशासाठी दोन कर्मचाऱ्यांनी थेट 50 हजार रुपयांची लाच घेतल्याची प्रकार अमरावतीच्या भातकुल पंचायत समितीत घडला आहे.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अमरावती पथकाने कारवाई करत दोघांना गजाआड घातलं आहे. या कारवाईबरोबरच, राज्यात RTE प्रवेशासाठी लाच मागणारे पहिलं प्रकरण समोर आलं आहे.

कंत्राटी कर्मचारी हर्षवर्धन वासुदेव इंगळे (वय 42) आणि प्रभारी केंद्र प्रमुख नरेंद्र गोपाळकृष्ण धनस्कर (वय 54) या दोघांनी ही लाच घेतली. दोघांविरोधात राजापेठ पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे राज्यातील प्रशासकीय पंचायत समिती वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या मुलीला RTE अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर, पत्ता पडताळणीसाठी 50 हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तुम्ही दिलेल्या ऑनलाईन पत्त्यावर राहत नाही, त्यामुळे कठोरा इथल्या टोमोय इंग्लिश स्कूलमध्ये (School) प्रवेश मिळणार नाही, अशी बतावणी करत ही लाच मागण्यात आली.

पत्ता पडताळणीचा सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी तब्बल 50 हजार रुपये देण्याची मागणी केल्याने, तक्रारदाराने ACBच्या पथकाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या पडताळणीत, तथ्य आढळल्यानंतर, पथकाने रुख्मिणीनगर परिसरात सापळा लावत दोघांना लाच घेताना ताब्यात घेतले.

25 हजार रुपये रोख आणि 25 हजार रुपये डमी नोटा स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. या लाच प्रकरणात दोघांविरोधात राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीच्या प्रशासकीय आणि शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील 257 शाळांमधील जागांसाठी सुमारे 2500 विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झाली आहे. निवड झालेल्या पाल्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे कळवण्यात आले असून कागदपत्रे पडताळणीचे काम सुरू आहे. आरटीई ही पूर्णपणे मोफत आणि ऑनलाइन प्रक्रिया आहे. यामध्ये कोणालाही पैसे देण्याची गरज नसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT