Mahayuti alliance : 2029चा भाजपचा ‘गेम प्लॅन’ ठरला? शिंदे-पवारांना धक्का देणार; शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिलेदाराची भविष्यवाणी

Shiv Sena UBT Vinayak Raut claimed BJP may marginalize Eknath Shinde Shiv Sena and Ajit Pawar NCP 2029 Maharashtra political battle : महायुतीत भाजप पक्ष 2029ला कोणत्यापद्धतीने निवडणुकांना समोरे जाईल, याची भविष्यवाणी शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केली.
Shiv Sena UBT Vinayak Raut
Shiv Sena UBT Vinayak RautSarkarnama
Published on
Updated on

BJP 2029 Maharashtra politics : महायुतीचं 2029चे राजकारण कसे असेल, यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

भाजप 2029च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला बाजूला सारेल, असे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. विनायक राऊथ यांच्या या भविष्यवाणीचे महायुतीकडून काय प्रतिक्रिया येते, विशेष करून, एकनाथ शिंदे शिवसेना काय प्रतिक्रिया देते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

देशात नुकताच, पाच राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. या भाजपने (BJP) दमदार कामगिरी केली आहे. विशेष करून, पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडवत, तिथं सत्ता स्थापनेची लगबग सुरू झाली आहे. या विजयाचे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे, तर देशभरातील प्रादेशिक पक्ष सावध झाले आहेत.

महाराष्ट्रात देखील पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयावर विश्लेषण केले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे (ShivSena UBT) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी, यावर मोठी भविष्यवाणी केली आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भावी मुख्यमंत्री, असे बॅनरवर झळकले आहेत, यावर प्रतिक्रिया देताना, त्यांनी ही भविष्यवाणी केली.

विनायक राऊत म्हणाले, "सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं किंवा नाही, हा त्यांचा पक्षाचा, महायुतीचा प्रश्न आहे. सुनेत्रा पवार यांना बारामतीकरांनी अजितदादांनंतर मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना त्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावं, हे वाटणं सहाजिक आहे."

'2029सालची निवडणूक भाजप स्व-ताकदीवर लढेल, यात एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी बाजूला फेकलेले असतील,' अशी मोठी भविष्यवाणी विनायक राऊत यांनी केली.

तसंच, कणकवलीचे संदेश पारकर हे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. विनायक राऊत यांनी, संदेश पारकर कणकवली निवडणूक जिकल्यानंतर त्यांची वाटचाल एकनाथ शिंदे शिवसेनेच्या दिशेने सुरू होती. मात्र आम्ही त्यांच्यावर पाणी सोडलं आहे, असे म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com