dharampal meshram Sarkarnama
विदर्भ

BJP setback : भाजपला मोठा राजकीय धक्का! अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांचा अनपेक्षित पराभव

BJP political setback latest news : भाजपसाठी मोठा राजकीय धक्का; अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांचा अनपेक्षित पराभव, राजकीय वर्तुळात चर्चा.

Rajesh Charpe

महापालिकेच्या निवडणुकीत नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे उमेदवार आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या प्रभागातील तीन भाजपचे उमेदवार निवडून आले असून काँग्रेसच्या शुभम मोटघरे यांनी मेश्राम यांना पराभूत केले.

विशेष म्हणजे धर्मपाल यांच्या विरोधात त्यांचे सख्खे भाऊ व माजी नगरसेवक यशवंत मेश्राम हेसुद्धा या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे होते. दोन्ही भावाचा येथे पराभव झाला आहे.

भाजपने या प्रभागातून दोन माजी नगरसेवकांना बदलले होते. त्यांच्या ऐवजी शारदा बारई आणि सीमा ढोमणे यांना उमेदवारी दिली होती. या दोन्ही महिला प्रथमच निवडून आल्या आहेत. याच प्रभागातून भाजपचे माजी शहर अध्यक्ष आणि स्थायी समितीचे माजी सभापती बंटी कुकडे यांना आपली जागा राखण्यात यश आले. त्यांच्या विरोधात काँग्रेसने भाजपचेच माजी नगरसेवक प्रवीण नरड यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे सामना अटीतटीचा रंगला होता.

मोठमोठे नेते शेवटच्या दिवसापर्यंत प्रचारात उतरले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेसने मैदानात उतरवले होते तर भाजपचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना घरोघरी फिरवले होते. याचा फायदा बंटी कुकडे यांना झाल्याचे दिसून येते.

काँग्रेसने कुकडे यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र ॲड. धर्मपाल यांचा गेम झाला. मेश्राम हे मोठ्या नेत्याप्रमाणे मागत होते. प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात नव्हते. त्यांच्या विषयी तक्रारीसुद्धा होत्या. यानंतरही सर्वेचा रिपोर्ट बघून उमेदवारी वाटप केल्याचा दावा भाजपच्या नेत्यांमार्फत केला जात होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT