Chhatrapati Sambhajinagar Winning Candidates Full List : छत्रपती संभाजीनगरचा गड कुणी राखला अन् कुणी गमावला? दिग्गजांना धक्का की नवख्यांची बाजी? वाचा सविस्तर निकाल...

Chhatrapati Sambhajinagar Election 2026 Results : छत्रपती संभाजीनगर निवडणूक निकाल जाहीर. गड कुणी राखला, कुणी गमावला? वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी.
ward-wise election results Sambhajinagar
ward-wise election results SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

राज्यभर लक्ष वेधून घेतलेल्या आणि मराठवाड्याचं प्रमुख केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निकालांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी घेतली आहे. उमेदवारीवरून जोरदार राडा झाल्यानंतरही भाजपने महापालिकेत आपली ताकद दाखवून दिल्याचे आतापर्यंत हाती आलेल्या कलांमधून दिसते आहे.

महानगरपालिकेच्या एकूण 115 जागांसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करत निवडणूक लढवली होती. शहराच्या सत्तेवर नेमकं कोणाचं वर्चस्व राहणार, याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. प्रचाराच्या काळात प्रत्येक पक्षाने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

मुंबई महानगरपालिकेत महायुतीने दमदार कामगिरी केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप तीस जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. तर शिवसेना शिंदे गट १५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ८ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने सात जागा जिंकल्या आहेत. तर एमआयएम १५ जागांवर आघाडीवर आहेत, तर काही उमेदवार त्यांचे विजयी झाले आहेत. काँग्रेस दोन, तर दोन्ही राष्ट्रवादी प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.


छत्रपती संभाजीनगर निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी (Sambhajinagar Municipal Corporation Result) - सविस्तर यादी लवकरच...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या गुलमंडी प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे हे विजयी झाले आहेत. दुसरीकडे याच पक्षाचे दुसरे नेते अंबादास दानवे यांचे भाऊ राजेंद्र दानवे मात्र पराभूत झाले आहे. शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषीकेश जैस्वाल हे ही अटीतटीच्या लढतीत विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com