Sajid Khan Pathan threat Sarkarnama
विदर्भ

Sajid Khan Pathan threat : “दोन दिवसात 10 कोटी दे, नाही तर..!” भाजप पाठोपाठ काँग्रेस आमदाराला बिश्नोई गँगचा 'गेम ओव्हर'चा मेसेज

Bishnoi Gang Threatens Akola MLA Over Rs 10 Crore Extortion : अकोला इथले काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या मोहक्याने खंडणीसाठी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Akola crime news : बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणकर याने आता अकोला इथले काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना दहा कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिली आहे.

भाजप आमदार प्रकाश भारसाकले यांच्यापाठोपाठ काँग्रेस आमदार पठाण यांना धमकी दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आमदार पठाण यांना शुभम लोणकर याने दिलेल्या धमकीचा ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आलं आहे.

अकोला पश्चिमचे काँग्रेस (Congress) आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणकर याने 10 कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. "दोन दिवसात 10 कोटी रुपये दे,‌ नाहीतर तुझा गेम करू", अशी धमकी शुभम लोणकर याने आमदार पठाण यांना दिली आहे. शुभम लोणकरने धमकीचा हा कॉल कॅलिफोर्नियावरून केल्याचं समोर येत आहे. दरम्यान, धमकीचं ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आलं आहे.

बिश्नोई गँगकडून अकोटचे भाजप (BJP) आमदार प्रकाश भारसाकले यांच्याकडे देखील दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या मागणीसंदर्भात भाजपचे अकोट शहराध्यक्ष हरिष टावरी यांना धमकीचा कॉल आला होता. आता काँग्रेस आमदार पठाण यांना धमकीचा फोन आला आहे. यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

बिश्नोई गँगकडून एकाच जिल्ह्यात एका पाठोपाठ एक राजकीय नेत्यांना टार्गेट करण्यात येत असल्याने, पोलिसांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. दोन्ही आमदारांच्या सुरक्षिततेसंदर्भात पोलिसांकडून आढावा घेतला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याच काळात अशा धमक्या आल्याने त्याची संवेदनशीलता वाढली आहे.

बाॅलिवूडमधील दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावरील बेछूट गोळीबार, यानंतर ठाणे इथल्या उद्योजकाला देखील खंडणीसाठी धमकावण्याचा प्रकार घडला होता. या दोन्ही घटनांमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचे म्हटले जात होता. बिश्नोई गँग आपल्या दहशतीच्या जोरदार देशात विस्तार करत असून, ही आगामी काळात केंद्र व राज्य सरकारची डोकेदुखी ठरणार आहे.

फोनवरील संभाषण....

गँगस्टर शुभम : शुभम लोणकर बोलतोय..

आमदार साजिद खान पठाण : हा बोला...

गँगस्टर शुभम : गुगलवर सर्च करा, कोण आहे माहिती होईल. आमदार साजिद खान पठाण : जी बोला..

गँगस्टर शुभम : बाबा सिद्दिकीला मारलं, आता तुझी वेळ आहे.

आमदार साजिद खान पठाण : माझं काय घेणं देणं?

गँगस्टर शुभम : बाबा सिद्दिकी प्रमाणेच तुझा हाल करू.

आमदार साजिद खान पठाण : माझं काय घेणं, तुम्ही मोठे लोक आहेत, मोठ्या लोकांच्या मागे लागा, मी छोटा माणूस आहे.

गँगस्टर शुभम : छोटा आहेस, व्यवस्थित ऐक काय बोलतोय.

आमदार साजिद खान पठाण : हा...

गँगस्टर शुभम : 10 कोटी पाहिजे, तुला फोन केला आहे तर पैसे द्यावेच लागतील. नाही दिले तर तू जिथं बसतं उठतं, खैर मोहम्मद प्लॉटमध्ये राहतो, आणि काँग्रेस पक्षाचा आहे.

आमदार साजिद खान पठाण : हा...

गँगस्टर शुभम : तुझे प्रत्येक कांड माझ्याजवळ लिहिलेले आहेत, तुझ्या फॅमिलीतले आणि सोबतचे सर्व माहिती आहे. तुझ्याकडे दोन दिवसाची वेळ आहे, ऐकून घे नीट.

आमदार साजिद खान पठाण : हा..

गँगस्टर शुभम : 10 कोटींची व्यवस्था नाही केली तर बाबा सिद्दिकी प्रमाणेच हाल करणार. नाहीतर माहिती करून घे माझ्याबद्दल.

आमदार साजिद खान पठाण : तो मी नाही, बद्रुजम्मा वेगळा आहे, ज्याबद्दल तुम्ही बोलत आहात. कदाचित चुकीच्या व्यक्तीला फोन केला.

गँगस्टर शुभम : नाही.. तूच साजिद खान आहे, सर्व माहिती माहिती मला.

आमदार साजिद खान पठाण : एस.. मी तर साजिद पठाणच आहे ना.

गँगस्टर शुभम : तुझं सर्व माहिती आहे, जास्त गोष्टी करू नको आमदार आहेस ना..

आमदार साजिद खान पठाण : हा आता आमदार आहे.

गँगस्टर शुभम : साथ मे चलेगा तो बहुत ऊपर लेके जाऊंगा.

आमदार साजिद खान पठाण : मला हे समजत नाहीये, कोणता कारवार आहे का?, दोन नंबरचे धंदे आहेत का?.

गँगस्टर शुभम : तू दोन नंबरचे धंदे चालवतं, सर्व माहिती आहे मला.

आमदार साजिद खान पठाण : मी नाही करत. माझा रेकॉर्ड काढा आणि एकाही धंद्यात सहभाग दाखवा.

गँगस्टर शुभम : माझं नीट ऐक साजिद खान, माझे सर्व पोट्टे पाहून गेले, फक्त आदेश द्यायचा आहे, तुझ्याकडे 2 दिवसाचा वेळ आहे.

आमदार साजिद खान पठाण : एवढे पैसे कुठून आणू?

गँगस्टर शुभम : सर्व आणू शकतो दोन नंबरचे काम आहेत तुझे. आम्ही दोन नंबर वाल्यांनाचं फोन करतोय.

आमदार साजिद खान पठाण : मरण्याची भीती नाही मला, पण तुम्हाला गैरसमज होतोय कदाचित चुकीची माहिती मिळाली.

गँगस्टर शुभम : काहीच गैरसमज नाही.

आमदार साजिद खान पठाण : हॅलो..

गँगस्टर शुभम : ऐकून घे साजिद खान. तुला मारण्याची भीती नाही आहे ना..दाखवतो तुला मौत का डर क्या होता है!

आमदार साजिद खान पठाण : खरच सांगतोय मरण्याची भीतीने पण तुमच्याकडे चुकीची माहिती आहे.

गँगस्टर शुभम : माझ्याकडे व्यवस्थित माहिती आहे..

आमदार साजिद खान पठाण : बोलण्याची गोष्ट करताय कारण तर सांगा. कोणतं नविन काम केलं असेल कुठून पैसे उचलले असतील.

गँगस्टर शुभम : साजिद खान ऐकून घे तुला गोळी नाही मारली ना तर माझं नाव शुभम लोणकर नाही. माझ्याबद्दल माहिती करून घे मग बोल. 10 कोटी रुपये तुझ्यासाठी मोठी रक्कम नाहीये.

आमदार साजिद खान पठाण : मी काय म्हणतोय पैसे बद्दल माझ्याबद्दल मोठी गैरसमज आहे.

गँगस्टर शुभम : काहीच गैरसमज नाही, मी फोन केलाय साजिद खान ऐकून घे. दोन का सहा महिन्याने पण मारणार तुला.

आमदार साजिद खान पठाण : माझ्याकडे पैसे असते ना 2019 ची निवडणूक जिंकली असती.

गँगस्टर शुभम : हा..

आमदार साजिद खान पठाण : मी विरोधातला आमदार आहे सत्तेतला नाही.. तुम्हाला काय करायचं ते करा. पण काही करायच्या अगोदर माझी चौकशी करा.

गँगस्टर शुभम : तू दोन नंबरच्या धंदे करतोय, आम्हाला काही घेणं देणं नाही.

आमदार साजिद खान पठाण : माझ ऐकून घ्या.

गँगस्टर शुभम : साजिद खान ऐकून घे.

आमदार साजिद खान पठाण : तुम्हाला जे करायचे ते करा पण माझे इन्फॉर्मेशन काढून घ्या.

गँगस्टर शुभम : मरण्याची भीती नाही ना, तुला दाखवून देतोय. तुझ्यासोबतच कुणी भेटला ना लवकरच चमत्कार दाखवणार. ही गोष्ट नीट ऐकून घेशील. तुला त्याच्याजवळ जायचं तिथे जा पण लवकरच तुला चमत्कार दाखवणार.

आमदार साजिद खान पठाण : ठीक आहे काय हरकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT