Farmers Workers Long March : 148 किलोमीटरच्या लाँगमार्चनं सरकार हादरलं? कष्टकऱ्यांना दाखवला नोटिसांचा धाक; अजित नवले म्हणाले, “छाताडावर बसू!”

Akole–Ahilyanagar Long March Led by Ajit Nawale Against Mahayuti Govt : आदिवासी, शेतकरी, कर्मचारी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्यातील भाजप महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अकोले ते अहिल्यानगर लाँग मार्चला सुरवात.
Akole to Ahilyanagar Long March
Akole to Ahilyanagar Long MarchSarkarnama
Published on
Updated on

Akole to Ahilyanagar Long March : आदिवासी, शेतकरी, कर्मचारी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आज राजूर (ता. अकोले) ते अहिल्यानगर, असा 148 किलोमीटर लाँगमार्चला सुरवात झाली आहे. अखिल भारतीय किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनने हा लाँग मार्चचं आयोजन केलं असून, डाॅ. अजित नवले याचं नेतृत्व करत आहे.

दरम्यान, मोर्चामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसं झाल्यास प्रचलित कायद्यानुसार कारवाई करू, अशी पोलिसांमार्फत अजित नवले यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीचा स्वीकार करत, अजित नवले यांनी, 'दडपशाहीला न जुमानता लाँग मार्च निघणारच, आम्ही घामाचे दाम मागतोय, सरकारच्या छातावर आम्ही जाणारच,' असा इशारा दिला आहे.

आदिवासी, शेतकरी (Farmer), कर्मचारी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आज अकोले तालुक्यातील राजूर ते अहिल्यानगर, असा 148 किलोमीटर लाँगमार्चला सुरवात झाली आहे. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा लोणी अन् पुढे अहिल्यानगर इथं येऊन धडकणार आहे.

या लाँगमार्चमध्ये हजारो आंदोलक पायी सहभागी झाले आहेत. यात शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिला (Women) देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. मंत्र्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलांना 25 हजार पगार आणि आम्हाला अवघे अडीच हजार, हा कुठला न्याय? असा प्रश्न उपस्थित करत लाँगमार्चमध्ये सहभागी झालेल्या महिलांचे डोळे पाणवले होते.

Akole to Ahilyanagar Long March
Madhi Yatra controversy : 'मढीत ‘मुस्लिम विरोधी’ ठराव, कोर्टानं दिलाय मोठा निर्णय'; पण पुन्हा मुद्दा तापायचं कारण काय? जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार?

अकोले, संगमनेर, लोणी आणि त्यानंतर अहिल्यानगर इथं मोर्चा पोहोचणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी इथल्या निवासस्थानावर देखी हा लाँगमार्च धडकणार आहे. पालकमंत्र्यांच्या दारात प्रश्न सुटले नाहीत, तर हा लाँगमार्च थेट अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Akole to Ahilyanagar Long March
Mahavitaran Fraud Case : बनावट गॅरंटीचा ‘करंट’! महावितरणला 122 कोटींचा गंडा; आर्थिक गुन्हे शाखेचे 'मल्टीस्टेट रेड'

दरम्यान, लाँगमार्चच्या पार्श्वभूमीवर कायदा-सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, पोलिसांमार्फत अजित नवले यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अजित नवले यांनी या नोटिशीचा स्वीकार करत, सरकारवर जोरदार टीका केली.

नोटिशीची धिक्कार

अजित नवले म्हणाले, टअखिल भारतीय किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या लाँगमार्चच्या मागण्यांची दखल सरकारने घेण्याऐवजी, आता दडपशाही करायला सुरवात केली आहे. आम्हाला नोटीस बजावण्यात आली आहे. लाँगमार्चमध्ये कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती तयार केली, तर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करणार. सरकारने सर्वच प्रकारच्या कारवाई करण्याची तयारी सरकारची आहे. मात्र घामाचा दाम देण्याची तयारी सराकरची नाही. ही संतापजनक प्रकार आहे.

इशारा अन् सल्ला देखील...

'किसान सभेच्यावतीनं नोटिशीचा धिक्कार करत आहोत. कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला जुमाणणार नाही. आम्ही चालणार आहोत. सरकारच्या छाताडावर हे सर्व श्रमिक जातील. सरकारने अशा प्रकारे दडपशाही करण्याऐवजी, मागण्या मान्य कशा करता येतील, मागण्यांवर अंमलबजावणी कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करावे, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला आहे,' असे देखील देखील अजित नवले यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com