Akola Protest Sarkarkarnama
विदर्भ

Radhakrishna Vikhe Patil : धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला; भाजप पदाधिकाऱ्यांचे राधाकृष्ण विखेंविरोधातच आंदोलन

Sunil Balasaheb Dhumal

Akola Political News : राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचे मुद्दे ज्वलंत बनले आहेत. याचा फटका राज्यकर्त्यांना बसताना दिसत आहे. यातच भंडारा उधळल्याने धनगर समाजातील कार्यकर्त्याला मारहाणीचे प्रकरण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना भोवण्याची शक्यता आहे. समाजाच्या वतीने विखेंविरोधात राज्यभर आंदोलन होत आहेत. आकोला येथे मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच विखेंच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. ठाकरे गटाने हा व्हिडोओ व्हायरल करून भाजयुमोसह भाजपला लक्ष्य केले. (Latest Political News)

अकोल्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती व सकल युवक धनगर समाज संघटनेकडून अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या प्रतिमेसमोर निदर्शने करण्यात आली. धनगर आरक्षणाबाबत झालेल्या आंदोलनात मंत्री विखे पाटलांच्या प्रतिमेला काळे फासले. धनगर समाजाच्यावतीने हे आंदोलन केले असले तरी शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपसह भाजयुमोवर टीका करण्याची संधी साधली.

या आंदोलनात सहभागी पदाधिकाऱ्यांपैकी एक पदाधिकारी भारतीय जनता युवा मोर्चाशी संबंधित असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. या पदाधिकाऱ्यानेही आंदोलनात जोरदार नारेबाजी केली. नेमक्या या घटनेचे फोटो व व्हिडीओ ठाकरे गटाने व्हायरल करीत अकोल्यात भाजप व भाजयुमोला धारेवर धरले. भाजपाचेच तरुण भाजपाच्याच नेत्याच्या प्रतिमेला चपला मारून घरचा अहेर देत असल्याच्या पोस्ट ठाकरे गटाकडून सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Political News)

धनगर समाजाला (Dhangar) एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र भाजयुमोचेच पदाधिकारी आपल्याच नेत्यांच्या प्रतिमेला चपला कसे मारू शकतात, असा विरोधी प्रचार ठाकरे गटाने अकोल्यात सुरू केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव युवा समितीचे अध्यक्ष सुमित नवलकार, रवीरज घोंगे, विठ्ठल कवडकार, प्रशांत पातोंड, संजय नागे, केतन कात्रे, गजानन पातोंड, मोतीराम पातोंड, शुभव कवडकार, प्रथमेश अघडते, अविनाश कोकाटे, महादेव नवलकार, गजानन कोगदे, भाग्येश पांडे, प्रशांत भिवटे, हरीश कवडकार आदींनी या आंदोलनात सहभाग घेत आरक्षणासाठी निवेदन सादर केले.

(Edited Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT