BJP Flag Sarkarnama
विदर्भ

Nagpur BJP : ...अन् दक्षिणचा आमदार पाठवला पश्चिममध्ये! नागपुरात भाजप श्रेष्ठींचा कार्यकर्त्यांनाच धक्का

Nagpur West constituency: भाजपकडून अद्याप बंडखोर समोर आली नसली तरी येथील प्रबळ दावेदार तसेच इच्छुक 'ऑऊट ऑफ कव्हरेज' झाले आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News: कालपर्यंत भाजपने नागपूर(पश्चिम) विधानसभा मतदासंघाचा सस्पेंस कायम ठेवला होता. आज(सोमवार) दक्षिण नागपूरचे माजी आमदार तसेच ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देऊन भाजपने आपल्याच कार्यकर्त्यांना जबर धक्का दिला आहे. भाजपकडून अद्याप बंडखोर समोर आली नसली तरी येथील प्रबळ दावेदार तसेच इच्छुक 'ऑऊट ऑफ कव्हरेज' झाले आहेत.

पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेसचे आमदार तसेच शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासोबत आता कोहळे यांचा सामना होणार आहे. नागपूर (पश्चिम) मतदारसंघामधून माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाचे सचिव संदीप जोशी यांच्यासह प्रगती पाटील, नरेश बरडे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. दोन दिवसांपूर्वी कोहळे यांचे नाव समोर येताच भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते.

संदीप जोशी यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली होती. दयाशंकर तिवारी यांनी उमेदवारीसाठी नागपूर(मध्य)मधून आपला मुक्काम नागपूर(पश्चिम)मध्ये हलवला होता. महिला प्रतनिधी म्हणून प्रगती पाटील यांनाही आशा होती. त्यांना तयारी करण्याचे संकेतही पक्षाच्या बड्या नेत्यांनी दिले होते. मात्र येथे भाजपच्या नेत्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना जबर धक्का दिला.

सुधाकर कोहळे हे दक्षिण नागपूरचे आमदार होते. २०१९च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून आमदार मोहन मते यांना देण्यात आले होते. नाराज असलेले कोहळे अधूनमधून बंडाचे इशारे देत होते. नंतर त्यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष करून भाजपने(BJP) कामाला लावले होते. सुरुवातीलीला त्यांना सावनेर किंवा काटोल यापैकी एक मतदारसंघ निवडण्यास सांगण्यात आले होते. मात्र कोहळे दक्षिणवर अडून बसले होते.

उमेदवारी द्यायची असेल तर दक्षिणचीच द्या, हीच माझी कर्मभूमी असल्याचे ते सांगत होते. विधान परिषदेचेही गाजर त्यांना दाखवण्यात आले होते. मात्र राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये त्यांचे नाव नव्हते. आता त्यांना पश्चिम नागपूरमध्ये निवडणूक लढण्यास सांगण्यात आले आहे. भाजपच्या यादीतही त्यांचे नाव आले आहे. कोहळे यांना विद्यमान आमदार तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचा मुकाबला करावा लागणार आहे.

(Edite by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT