Anil Deshmukh : 'एका उंदराला सगळे 'टरबूजा' म्हणायचे...'; अनिल देशमुखांच्या पुस्तकातील 'त्या' पानांवरील मजकूर काय?

Anil Deshmukh's Diary of a Home Minister Book : "महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या - लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय! माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय."
Devendra Fadnavis, Anil Deshmukh
Devendra Fadnavis, Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 27 Oct : माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी त्यांच्या 'डायरी ऑफ ए होम मिनिस्टर' पुस्तकातील काही पानांचे फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. या पुस्तकातील 'टरबुजा' या प्रकरणातील मजकूर शेअर करत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

शिवाय हे प्रकरण ट्विट करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, उंदीर आणि टरबूज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

या पुस्तकातून अनिल देशमुखांनी तुरुंगात त्यांची कशाप्रकारे उपासमार व्हायची याबाबतचा खुलासा केला आहे. ते ज्या कोठडीत होते तिथे चिंचुद्री आणि उंदरांचा सुळसुळाट असायचा त्यांचा आपल्याला खूप त्रास सहन करावा लागल्याचं त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे.

Devendra Fadnavis, Anil Deshmukh
Bandra Terminus stampede : "रील मंत्री, 'रेल्वे मंत्री' झाले असते तर ..."; वांद्रे स्टेशनवरील चेंगराचेंगरीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) आपल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय! माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत."

Devendra Fadnavis, Anil Deshmukh
TOP Ten News : वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, 'मविआ'त बंडखोरी अटळ, NCP ची तिसरी यादी जाहीर, वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

तर त्यांनी ट्विटमध्ये शेअर केलेल्या पुस्तकातील मजकूर पुढीलप्रमाणे -

'तुरुंगात अनेकांना घरचं जेवण दिलं जात असे. मात्र मला घरचं जेवण द्यायला न्यायालयाची परवानगी नव्हती, म्हणून मला तुरुंगतील जेवणच दिलं जायचं. तुरुंगातील जेवण कसं असतं याचा अंदाज वाचक लावू शकतात; मात्र त्यापेक्षाही तुरुंगातील जेवण कितपत सुरक्षित आहे, याची सतत धाकधूक असायची. संपूर्ण तुरुंगात आणि माझ्याही सेलमध्ये उंदीर-चिचुंद्रयांची अगदी भाऊगर्दीच होती.

कित्येकदा तर असं व्हायचं की जेवण यायचं आणि मला जेवायला थोडा जरी उशीर झाला, तर तोवर उंदीर-चिचुंद्रया त्यावर तुटून पडलेल्या असायच्या. यामुळे कित्येकदा माझ्यावर उपाशी झोपण्याची पाळीही आली. रविवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी तर जेवणाची परिस्थिती आणखीच खराब असायची; कारण रविवारी दुपारी 12 वाजता सेलचे दरवाजे जे बंद व्हायचे, ते थेट दुसऱ्या दिवशी 12 वाजता उघडायचे.

म्हणजेच रविवारी दुपारी 12 वाजता जे जेवण मिळायचं त्यावरच दुसऱ्या दिवशी जेवण मिळेपर्यंतची वेळ मारून न्यावी लागायची. त्याशिवाय रविवारी दुपारी आलेलं जेवण उरवून उंदीर-चिचुंद्रयांपासून त्याचं रक्षण करण्यासाठी ते बादलीच्या वर ठेवून त्याची राखण करत बसावं लागायचं ते वेगळंच.

तसे तर तुरुंगात खूपच उंदीर आणि चिंचुद्रया होत्या; मात्र त्यामध्ये एक उंदीर एकदम वेगळा होता. अगदी गलेलठ्ठ. साहजिकच त्यामुळे तुरुंगातील सगळे त्याला 'टरबूजा' म्हणायचे. त्याला कितीही दूर हाकलायचा प्रयत्न केला, तरी तो अशा काही नजरेने आपल्याकडे बघायचा की जणू काही त्याची ती नजर सांगत असायची 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...!'

त्यांच्या या पुस्तकातील संदर्भ आणि त्यातील नावे त्यांनी उघड घेतली नसली तरी त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवर टीका आणि आरोप केल्याचं दिसत आहे. शिवाय त्यांनी व्यंगचित्रातून फडणवीसांची (Devendra Fadnavis) खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या आरोपावर भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जातेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com