BJP has given new leadership : भारतीय जनता पक्षाने २०१९मध्ये उमेदवारी नाकारून तत्कालीन आमदार सुधाकर कोहळे यांना अडगळीत टाकले होते. दरम्यानच्या काळात ते अधूनमधून एखाद्या कार्यक्रमामध्ये झळकत होते. आता पक्षाने त्यांना नागपूर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. शहराध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक बंटी कुकडे यांची नियुक्ती केली आहे. (Chandrasekhar Bawankule has published the list of new office bearers)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची यादी प्रकाशित केली आहे. यामध्ये वर्धा जिल्हाध्यक्षपदी सुनील ज्ञानेश्वर गफाट, भंडारा प्रकाश हरी बाळबुधे, गोंदिया यशुलाल हौशलाल उपराळे, गडचिरोली प्रशांत पुंडलिकराव वाघरे, चंद्रपूर राहुल गंगाधर पावडे, चंद्रपूर ग्रामीण हरीश जगदिशचंद्र शर्मा यांना नियुक्त केलेआहे.
बुलढाणा गणेश बाबुराव माटे, खामगाव सचिन पंजाबराव देशमुख, अकोला शहर जयंत रामराव मसने, अकोला ग्रामीण किशोर प्रल्हादराव मांगटे, वाशीम शाम शेषराव बडे, अमरावती शहर प्रवीण रामचंद्र पोटे, अमरावती ग्रामीण अनिल सुखदेवराव बोंडे, यवतमाळ तारेंद्र गंगाधर बोर्डे, तर पुसदची जबाबदारी महादेव रामाजी सुपारे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाने संपूर्ण राज्यातील जिल्हा व महानगराध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या करताना एकच पदाधिकारी पुन्हा त्याच पदावर राहणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर ग्रामीण व शहरी भागासाठी नवीन नेतृत्व भाजपने दिले आहे. नियुक्ती देताना मराठा आणि ओबीसी (OBC) या दोन घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सामाजिक समीकरण साधनाचा प्रयत्न या नियुक्त करताना दिसून आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
अकोला (Akola) जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करताना प्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीर सावरकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. भाजपचे (BJP) नवीन महानगराध्यक्ष जयंत मसने यांची पत्नी अर्चना मसने या माजी महापौर आहेत.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.