Nagpur Vidhansabha Election Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ सोमवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते विदर्भात येणार आहेत. ते विधानसभा निवडणुकीच्या आढावा घेणार असून विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थिती जाणून घेणार आहेत. बड्या नेत्यांच्या वाढत्या फेऱ्या लक्षात घेता लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात बसलेला फाटक्याची चांगसलीच धास्ती भाजपने घेतली असल्याचे दिसून येते.
लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भाने भाजपला चांगलाच झटका दिला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि अकोल्याचे अमित धोतरे यांचा अपवाद वगळता भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत विदर्भातून युतीचे दहापैकी नऊ खासदार निवडून आले होते. लोकसभेतील पडझड रोखण्यासाठी भाजपने आता पुन्हा विदर्भावर लक्ष केंद्रीय केले असल्याचे दिसून येते. नागपूर जिल्ह्यात निवडणूक प्रभारी म्हणून मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोदी (Narendra Modi) सध्या वर्ध्यात आहेत. विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी ते आले आहेत. अमरावती येथील टेक्सटाईल पार्कचे त्यांच्या हस्ते भूमिपजून करण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ तीन दिवसांनी अमित शाह येणार आहेत. ते विदर्भातील ६२ मतदारसंघांतील नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. काही मतदारसंघातील बुथ व शक्तिकेंद्रांचाही आढावा घेणार असल्याचे समजते. सकाळी नागपूर येथे आगमन झाल्यानंतर पूर्व विदर्भाचा जिल्ह्यानिहाय आढावा घेणार आहेत.
पश्चिम विदर्भातील संघटनात्मक व राजकीय स्थितीची माहिती घेतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय, संघटन सचिव डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित राहतील. यानंतर शाह संभाजीनगरला रवाना होणार आहेत. मतांचा टक्का वाढवण्यासाठी भाजपने राज्यातील जिल्ह्यांची जबाबदारी विविध नेत्यांकडे सोपवली आहे. याखेरीज सर्व प्रमुख नेते विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्याने व्यूह रचनेवर लक्ष केंद्रीत केले आहे. बावनकुळे यांचेही विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे सुरू झाले आहेत. फडणवीस यांनीही सरकार व संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रमांवर भर देत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान दोन वेळा विदर्भात येणार आहेत. आढावा बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय सूचना करतात व कोणता मंत्र देतात याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.