Hingna and Umred Constituency : रामटेकमधील हिंगणामधून काँग्रेस तर उमरेड येथून पवार गटाचा उमेदवार विधानसभा लढणार?

Mahavikas Aghadi Vs BJP : हे बदल हिंगण्याचे भाजपचे आमदार समीर मेघे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात, असंही बोललं जात आहे.
Congress and Sharad Pawar NCP
Congress and Sharad Pawar NCPsarkarnama
Published on
Updated on

Vidarbha Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक मताधिक्य देणारा हिंगणा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने मागून घेतला असून त्या बदल्यास उमरेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात येणार आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या मतदारसंघाच्या अदलाबदलीला नेत्यांनी मान्यता दिली असल्याचे समजते. हे बदल हिंगण्याचे भाजपचे आमदार समीर मेघे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते.

रामटेक लोकसभा मतदारसंघात(Ramtek Lok Sabha Constituency) येणाऱ्या हिंगणा विधानसभा मतदारसंघातून समीर मेघे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे रमेश बंग आणि विजय घोडमारे यांना पराभूत केले होतं. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत हिंगण्यातून भाजप पिछाडीवर होती. सुमारे १७ हजार मतांनी महायुतीचा उमेदवार मागे होता. ही भाजपसाठी धोक्याची घंटी मानली जात आहे. यातच लोकसभा निवडणुकीच्या काळात आमदार मेघे आणि सुनील केदार यांचे खटकले होते.

महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) श्यामकुमार बर्वे निवडून आल्यानंतर केदार यांनी हिंगण्यात विजयी सभा घेतली. यावेळी त्यांनी मेघे यांना खुले आव्हान दिले. येथे कुठल्याही परिस्थिती महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणतो असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. एवढंच नाहीतर त्यांनी वेळ पडल्यास स्वतः लढण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्याने केदार यांना स्वतः लढता येणार नाही. परंतु त्यांनी मतदारसंघाची अदलाबदली करून मोठी बाजी मारली असल्याचे बोलले जाते.

Congress and Sharad Pawar NCP
Pakistan on Article 370 : काँग्रेस - नॅशनल कॉन्फरन्सने 'कलम-370'बद्दल घेतलेल्या भूमिकेचे पाकिस्तानकडून समर्थन!

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपासून हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादी(NCP) लढत आहे. रमेश बंग येथून निवडून आले होते. मात्र विजय घोडमारे यांनी त्यांचा पराभव करून ही जागा भाजपला मिळवून दिली होती. तर समीर मेघे यांच्या आगमनानंतर त्यांना जागा सोडावी लागली. घोडमारे यांनी नंतरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मेघे यांच्या विरोधात निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

Congress and Sharad Pawar NCP
Uday Samant : 'मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीतच..' ; उदय सामंतांनी साधाला निशाणा!

यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर अनेकांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छा जागृत झाल्या आहेत. रमेश बंग पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची तयारी करीत होते. मध्यंतरी एका समारंभासाठी बंग यांनी शरद पवार यांना नागपूरमध्ये बोलावले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्याय यात्रेचा कार्यक्रम हिंगण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र तो वेळेवर रद्द करण्यात आला. आता जागेच्या अदलाबदलीचे वृत्त धडकल्याने रमेश बंग यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com