Sharad Pawar NCP Politics sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar NCP Politics : भाजपचा मोठा धक्का! शरद पवारांच्या माजी आमदाराचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! निवडणुकीत गजभिये पराभूत

BJP Vs NCP SP : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांना महापालिकेच्या निवडणुकीतही झटका बसला आहे.

Rajesh Charpe

  1. माजी आमदार प्रकाश गजभिये यांचा महापालिका निवडणुकीत पराभव झाला आहे.

  2. भाजपचे प्रथमच निवडणूक लढणारे उमेदवार योगेश पाचपोर यांनी निर्णायक विजय मिळवला.

  3. प्रभाग 13 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी होत गजभिये यांचा बालेकिल्ला कोसळला.

municipal election : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांचा महापालिकेच्या निवडणूकीतही पराभव झाला आहे. प्रथमच महापालिकेची निवडणूक लढत असलेले भाजपचे उमेदवार योगेश पाचपोर यांनी त्यांना धक्का देत त्यांचे पुन्हा महापालिकेच्या राजकारणात सक्रिय होण्याचे मनसुबे उधळून लावले आहेत. एकेकाळी गजभिये यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग १३ मधून भाजपचे चारही उमेदवार निवडून आले आहेत.

प्रकाश गजभिये यांना शरद पवार यांनी विधान परिषदेवर पाठवले होते. ते सहा वर्ष आमदार होते. विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी महापालिका निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. राजकारणात सक्रिय राहाता यावे यासाठी त्यांनी यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून लढण्याचा निर्णय घेतला होता.

सुमारे १५ वर्षानंतर महापालिकेच्या राजकारणात परतण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मात्र भाजपने यश मिळू दिले नाही. ते एकेकाळी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे समर्थक होते. आठवले शरद पवार यांना सोडून भाजप महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले. मात्र गजभिये यांनी पवारांची साथ सोडली नाही. याचे बक्षीस आमदार करून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते.

मात्र राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले. त्यामुळे प्रकाश गजभिये यांची परत विधान परिषदेत जाण्याची वाट अवघड झाली होती. त्यामुळे त्यांनी आपली महापालिकाच बरी म्हणून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती.

ते निवडणूक लढलेल्या प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपचे योगेश पाचपोर, रुतिका मसराम, वर्षा चौधरी आणि विजय होले हे चारही नगरसेवक निवडून आहेत. आमदार डॉ. परिणय फुके यांच्यावर भाजपने या प्रभागाची जबाबदारी सोपवली होती. याच प्रभागात भाजपने होले यांच्यासह किसन गावंडे यांनाही एबी फॉर्म दिला होता. मात्र गावंडे यांचा एबी फॉर्म बाद झाला. त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊ नये यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कोंडून ठेवले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

शेवटी परिणय फुके यांना त्यांची समजूत घालावी लागली होती. या प्रभागातून परिणय फुके यांनी दोन वेळा महापालिकेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी परिणिता फुके यांनीही दोन वेळा निवडणूक जिंकून भाजपसाठी हा प्रभाग भक्कम केला होता. त्याचे फळ भाजपच्या चारही उमेदवारांना चाखायला मिळाले.

लोकसभेच्या निवडणुकीत प्रभाग १३ ने काँग्रेसला सुमारे २५०० मतांची आघाडी दिली होती. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला सुमारे ३ हजार ३०० मतांची आघाडी मिळाली होती. मात्र, महापालिका निवडणुकीत आमदार डॉ. परिणय फुके यांची चित्र पालटले. भाजपला सुमारे सहा हजार मतांची आघाडी मिळवून दिली.

FAQs :

1. प्रकाश गजभिये कोणत्या पक्षाचे नेते आहेत?
ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत.

2. प्रकाश गजभिये कोणत्या निवडणुकीत पराभूत झाले?
ते महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.

3. गजभिये यांना पराभूत करणारे उमेदवार कोण आहेत?
भाजपचे उमेदवार योगेश पाचपोर यांनी त्यांना पराभूत केले.

4. प्रभाग 13 मध्ये निकाल काय लागला?
प्रभाग 13 मधील चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

5. या निकालाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर काय परिणाम होईल?
हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून पक्षाच्या स्थानिक ताकदीवर परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT