Sharad Pawar Politics : आमदारकी गेली, नगराध्यक्षपदासाठीही धडपडले... माजी आमदार आता शरद पवारांना सोडून शिवसेनेच्या वाटेवर?

NCPSP Former MLA Ramesh Kadam : चिपळूणमध्ये नगरपंचायत निवडणुकीत शरद पवार यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने नशीब आजमावे होते. मात्र येथे भास्कर जाधव यांनी पाठिंबा देवूनही जबर धक्का बसला होता.
Sharad Pawar And Former MLA Ramesh Kadam
Sharad Pawar And Former MLA Ramesh Kadamsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

  2. माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाकडून दुर्लक्ष आणि आश्वासनभंग झाल्याचा आरोप करत राजीनामा दिला.

  3. या राजीनाम्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटातील अंतर्गत असंतोष उघड झाला आहे.

Chiplun : नागेश पाटील

नुकताच राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. कोकणात देखील काटेंकी टक्कर देणाऱ्या लढती झाल्या. ज्यात चिपळुणच्या लढतीने राज्याचे लक्ष वेधले होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार रमेश कदम यांनी नगराध्यक्ष पदासाठी दंड थोपाटले होते. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. हाच पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी आता पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी पक्षात आपली किंमत नसल्याची खंतही व्यक्त करत कदम यांनी दिलेल्या राजीनाम्याने जिल्ह्यासह कोकणात खळबळ उडाली आहे. तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदारच आता शरद पवारांना सोडून शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरी झाली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार रमेश कदम यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. अडचणीच्या काळात पक्षासासाठी योगदान देऊनही एकाकी पाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पक्षाकडून जिल्हाध्यक्षपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जे पाळले गेले नाही असाही दावा त्यांनी केला असून प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाला आपली गरज राहिल्याचे दिसत नसल्याचे म्हणत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सोपवला आहे.

राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार रमेश कदम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. १९८४ पासून शरदचंद्र पवार याचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून त्यांच्या नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे. पक्षाच्या स्थापनेपासून तालुकाध्यक्ष म्हणून काम करत होतो. विधानसभा मतदार संघात तळागाळात काम करून मतदार संघात पक्ष संघटना मजबूत केल्याने २००४ साली विधानसभा निवडणुकीत विजयी झालो.

Sharad Pawar And Former MLA Ramesh Kadam
Sharad Pawar Politics : शरद पवारांचा मोठा निर्णय, एकही उमेदवार न देता गेम फिरवला; हितेंद्र ठाकूरांची ताकद वाढली!

त्याअगोदर ३५ वर्षे नगरसेवक व साडेनऊ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम करताना तालुक्यात पक्ष संघटना मजबूत केली. मंडणगडपासून राजापूरपर्यंत पक्षाचे अनेक कार्यकर्ते निर्माण केले. पक्षाच्या आदेशाप्रमाणे २०१४ ला रायगड लोकसभेची लोकसभेची निवडणूक लढवत १ लाख ३० हजार मते मिळाली. गतवर्षीच्या विधानसभा निवडणूकीत चिपळूण मतदार संघात पक्षाने नवीन उमेदवार दिला. तरिही त्यांचे रात्रंदिवस काम करून उमेदवाराला विजयापर्यंत नेऊ शकलो.

शरद पवार यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मात्र पक्षातील काहींनी विरोध केल्याने जिल्हाध्यक्षपदी निवड पुढे ढकलण्यात आली. यातून पक्ष स्थापनेपासून एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्यात आले. अद्याप जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय पक्ष श्रेष्ठींनी घेतला नाही. पालिकेच्या निवडणूकीत पक्षाला उभारणी मिळण्यासाठी स्वतः नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत उतरलो आणि उमेदवारही दिले.

मात्र अल्पशा मताने पराभव झाला. या निवडणूकीच्या काळात आघाडी वरिष्ठांकडून कोणताही संपर्क करण्यात आला नाही. पक्षाच्या कठीण परिस्थितीत लढा देताना, प्रामाणिकपणे काम करतानाही एकाकी पाडण्यात आले. पक्षाला आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याची गरज नाही. नाईलाजाने प्रांतिकच्या उपाध्यक्ष पदाचा व पक्ष सदसत्वाचा राजीनामा देत आहे. शरद पवार यांच्यावर निष्ठा आहे. परंतु अन्य नेत्यांकडून सहकार्य मिळाले नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता?

दरम्यान आता कदम कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. पण सध्या तरी आपल्या मनात पक्ष प्रवेशाचा विचार नसून थंड थांबणार आहे. त्यानंतर आपण विचार करू असे सूचक संकेत त्यांनी दिले आहे. मात्र त्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी असणारे राजकीय संबंध पाहता ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

Sharad Pawar And Former MLA Ramesh Kadam
Sharad Pawar Politics : महाविकास आघाडी टिकवण्यासाठी शरद पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर, काँग्रेस नेत्यांना फोन...

FAQs :

1. रमेश कदम यांनी कोणत्या पक्षाचा राजीनामा दिला आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा.

2. राजीनाम्याचं प्रमुख कारण काय सांगितलं आहे?
पक्षाकडून दुर्लक्ष, एकाकी पाडण्यात येणं आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न होणं.

3. कोणत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा झाला आहे?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर.

4. रमेश कदम यांनी राजीनामा कोणाकडे दिला?
पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा सादर केला आहे.

5. या राजीनाम्याचा पक्षावर काय परिणाम होऊ शकतो?
निवडणुकीच्या काळात पक्षाची संघटनात्मक ताकद आणि राजकीय रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com