devendra fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis : 'नरकातला स्वर्ग'ची CM फडणवीसांनी उडवली 'खिल्ली'; म्हणाले, 'मी कथा-कांदबऱ्या अन् बालवाड्मय...'

BJP CM Devendra Fadnavis Reacts to Shiv Sena Sanjay Raut Book Narkatla Swarg in Buldhana : भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत लिखित 'नरकातला स्वर्ग' पुस्तकावर प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Sanjay Raut book Narkatla Swarg : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग पुस्तकातील भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या दाव्यानं महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे.

भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकावर एका वाक्यात प्रतिक्रिया देत खिल्ली उडवली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बुलढाणा इथं दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग पुरस्तकातील दाव्यावर बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया म्हणजे, राऊत यांच्या दाव्यांची खिल्ली होती.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुस्तकात केलेल्या दाव्यांबाबत अजून बरचं काही लिहिलं असतं, पण मोठ मोठाले धमाके झाले असते. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी कांदबऱ्या वाचनं कधीच सोडलेलं आहे. कथा-कांदबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं वय राहिलेलं नाही. त्याच्यामुळे मी असल्या गोष्टी वाचत नाही".

संजय राऊत आणि त्यांच्या पुस्तकावर अधिक प्रश्न विचारल्यावर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांचे प्रतिनिधींचा प्रश्न मध्येच तोडत, 'त्यांचे सोडून द्या, ते कोण आहे. ते खूप मोठे नेते आहेत का?', असे प्रति प्रश्न केला. दरम्यान, संजय राऊत लिखित नरकातला स्वर्ग पुस्तकांचं प्रकाशन उद्या शनिवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे.

महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कसं समोरे जाणार, यावर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. राज्यात सत्ताधारी असलेल्या तिन्ही पक्षांनी महापालिका निवडणुका म्हणून एकत्र लढाव्यात, असा प्रयत्न असणार आहे. मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे काही ठिकाणी अपवादा‍त्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT