Ahilyanagar BJP news : मंत्री विखेंनी हेरलंय शहराध्यक्ष पदासाठी 'OBC' कार्ड; संधी मिळणार की, निष्ठावंतांच्या नावाखाली..?

Dhananjay Jadhav May Become Ahilyanagar BJP City President Support from Minister Radhakrishna Vikhe : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अहिल्यानगर जिल्ह्यात भाजप पक्ष संघटनेवर पकड मजबूत दिसते.
Ahilyanagar city BJP
Ahilyanagar city BJPSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar city BJP president : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असल्यानं महायुतीमधील भाजपने त्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने सुरुवातीला संघटनेतील मंडलाध्यक्ष, त्यानंतर आता जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर केल्या आहे. राज्यातील 58 जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर केल्या असून, वाद असलेल्या 20 निवडी मागे ठेवल्या आहेत. त्यात अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदाचा देखील समावेश आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शहरात 'ओबीसी कार्ड' कायम ठेवण्याच्या तयारी असून, इथं युवा चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. यात युवा चेहरा म्हणून, माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचं नाव आघाडीवर असून, धनंजय यांच्या रुपानं त्यांची तिसरी पिढी समाजकारण आणि राजकारणात आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असल्यानं या युवा चेहऱ्याला मंत्री विखेंकडून भाजप संघटनेत पद देण्यास 'ग्रीन सिग्नल' असल्याचे निश्चित मानले जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात भाजप (BJP) संघटनेत जिल्हाध्यक्षपद तिघांमध्ये विभागले आहे. नगर दक्षिण, नगर उत्तर आणि नगर शहर. यात दक्षिण आणि उत्तरेचे जिल्हाध्यक्षपद निश्चित केलं आहे. नगर दक्षिणमध्ये दिलीप भालसिंग, तर उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर या जुन्यांना संधी देण्यात आली आहे. हे दोघंही विखे समर्थक आहे. नगर शहर जिल्हाध्यक्ष पदाची निवड मात्र मागं ठेवण्यात आली आहे. ही निवड उद्यापर्यंत निश्चित होईल, असे भाजप संघटनेतील सूत्रांनी सांगितले.

Ahilyanagar city BJP
Top 10 News : 'ऑपरेशन सिंदूर' केवळ ढोंग; अमित शाह 'मातोश्री'च्या दारात घामाघूम होऊन उभे होते, वाचा राज्यातील महत्वाच्या घडामोडी...

अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सध्या भाजपचे ज्येष्ठ स्थानिक नेते अभय आगरकर यांच्याकडे आहे. अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. ओबीसी (OBC) नेते असल्याने त्यांचेही सर्व पक्षांमध्ये दांडगा संपर्क आहे. विखे पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी सहज जुळवून घेतले. ओबीसी चेहरा म्हणून त्यांना पुन्हा संधी मिळते का? याकडे देखील लक्ष असणार आहे.

Ahilyanagar city BJP
Operation Sindoor:सैन्यांची ताकद आणखी वाढणार; मोदी पुरवणार मोठी 'रसद'; हिवाळी अधिवेशनात मिळणार मंजुरी

परंतु भाजप संघटनेचे बदलतं रुप हे युवा आहे. त्यामुळे शहरात युवा चेहऱ्याला संधी देण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवली जात आहे. यात धनंजय जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. धनंजय जाधव विखे यांच्याबरोबर 2019 साली भाजपमध्ये प्रवेश केला. 2022 मध्ये अभय आगरकर शहर जिल्हाध्यक्ष असताना, त्यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचे काम करताना, त्यांनी अहिल्यानगर शहरातून त्यांच्या प्रभागातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिले.

मताधिक्य मिळून दिलं

तोफखाना, चितळे रोड, जंगू भाई तालीम, सातभाई मळा, नेहरू मार्केट, बागडपट्टी या भागातून विखे यांना सर्वाधिक 4 हजार 401, तर याच भागात शिवसेनेचे शिवालय येते, शिवसेनेचे विक्रम राठोड यांनी त्यावेळी नीलेश लंके यांच्या प्रचारात सक्रिय होते. तसेच शरद पवार यांची देखील सभा झाली होत. असे असताना लंके यांना या भागातून केवल 1 हजार 122 मते मिळाली होती. धनंजय जाधव यांच्या या कामगिरीची दखल भाजप पक्ष संघटनेने प्रदेश पातळीवर घेतली होती.

धनंजय जाधवांचे 'प्लस पाईंट'

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी धनंजय जाधव इच्छुक होते. तशी त्यांनी मोर्चे बांधणी देखील केली होती. उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. परंतु पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी थांबवली. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला होता. मनोज जरांगे यांचं ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाची मागणीनं संपूर्ण राज्य ढवळून निघालं होते. त्यावेळी 'ओबीसी'मधील आरक्षणाचा वैयक्तिक लाभ सोडत असल्याचे धनंजय जाधव यांनी जाहीर केलं होत. तसं जाहीर करणारे ते राज्यातील पहिले ओबीसी ठरले. या कृतीची देखील भाजप पक्ष संघटनेत दखल घेण्यात आली. युवा चेहरा म्हणून, नगर शहरातील युवकांमध्ये देखील त्यांना पसंतीचे स्थान आहे.

हे आहेत 'रेस'मध्ये...

अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप पक्ष संघटनेवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आता तरी पकड मजबूत दिसते. दक्षिण आणि उत्तर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत मंत्री विखेंचा वरचष्मा राहिलाय. अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी मंत्री विखेंचा शब्द अखेर असल्याचे सांगितले जाते. त्यातूनच धनंजय जाधव यांचे नाव आता पुढं आलं आहे. याशिवाय विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, सचिन पारखी, बाबा वाकळे, बाबासाहेब सानप, वसंत राठोड यांची देखील नावे चर्चेत आहेत.

सुजय विखे लक्ष घालणार

लोकसभा निवडणुकीनंतर माजी खासदार सुजय विखे यांचे नगर दक्षिणकडे लक्ष कमी झालेलं दिसतं. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीनिमित्तानं सुजय विखे यांनी पूर्वी दिलेला शब्द पूर्ण करणार असे दिसते आहे. शहरात आपण लक्ष घालणार, ते नेहमी म्हणत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अन् आता संघटनेच्या पदाधिकारी निवडीनिमित्ताने सुजय विखे पुन्हा लक्ष घालणार, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com