Devendra Fadnavis on Thackeray brothers Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis on Thackeray brothers : 'कब बाप बनेगा, कब बैल बटेंगे'; ठाकरे बंधुंच्या युतीवर फडणवीसांना शंका

BJP CM Devendra Fadnavis Reacts to Shivsena Uddhav Thackeray and MNS Raj Thackeray Alliance in Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणावर दिलेली प्रतिक्रिया शंकाकुशंका वाढवणारी आहे.

Rajesh Charpe

Shiv Sena MNS alliance : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांमार्फत तसे सूचक विधानं केली जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला बातमची देतो, असे सांगून या चर्चेत दम असल्याचे सुचित केले आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे.

मात्र भाजपला यावर अद्यापही शंका आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणावर दिलेली प्रतिक्रिया शंकाकुशंका वाढवणारी आहे. त्यांनी हिंदी भाषेतील 'कब बाप बनेगा, कब बैल बटेंगे', ही वाक्यप्रचार सांगून काही खरं दिसत नाही, असेच असेच सुचित केले.

ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणार तुम्हीच पतंग उडवत आहात. माध्यमांएवढी एवढी उत्सुकता दोघा भावांमध्ये नाही. दोन्ही भावांच्या युतीवर रोज काय बोलणार आहे. मी कालच बोललो. तेवढे पुरे आहे. जेवढा इंटरेस्ट राज ठाकरे व उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) युतीबद्दल माध्यमांमध्ये दिसत आहे, तेवढा दोन्ही भावांमध्ये दिसत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने सर्वांचे या घटनेकडे लक्ष लागले आहे. त्यातच उद्धव ठाकरे सेना आणि मनसेचे पदाधिकारी रोज नवे दावे आणि वक्तव्य करीत आहेत. उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाका राज ठाकरे दहा पावले समोर येतील या मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचे म्हणणे आहे.

उद्धव सेनेचे नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी दोन्ही नेत्यांमध्ये बातचित सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता दोन्ही भाऊ एकत्र येतील याची शक्यता बळावली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडी आणि महायुतीवर काय परिणाम होईल याबाबतही तर्क वितर्क लावणे सुरू झाले आहे.

ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेला फटका बसेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. दुसरीकडे राज ठाकरे आणि फडणवीस यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही भावांच्या युतीमागे नेमके काय राजकारण शिजत आहे याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT