Ramtek Constituency  Sarkarnama
विदर्भ

Ramtek Constituency : रामटेक काँग्रेसमुक्त; भाजपचे स्वप्न साकार

Loksabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्याच नेतृत्वात पुढील विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. असे असतानाही नागपूरच्या 11 जागा भाजपला राखता आल्या नाहीत.

Rashmi Mane

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे शिवसेनेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघ Loksabha constituency काँग्रेसमुक्त झाला आहे. सध्या रामटेक लोकसभा मतरसंघातील सहापैकी एकाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार शिल्लक राहिलेला नाही. भाजपचे काँग्रेसमुक्त Congress भारत करण्याचे स्वप्न शिवसेनेने पूर्ण करून दाखवले आहे.

दहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदी Narendra Modi आणि अमित शाह Amit Shah यांनी पदार्पण केल्यानंतर भाजपने काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी 11 जागा जिंकल्या होत्या. मात्र, सावनेर विधानसभा मतदारसंघात सुनील केदार Sunil Kedar यांनी नागपूर जिल्ह्याला काँग्रेसमुक्त होऊ दिले नव्हते. विशेष म्हणजे या वेळी सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढले होते. त्यानंतर राज्यात भाजप-सेना युतीचे राज्य आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्याच नेतृत्वात पुढील विधानसभेच्या निवडणुका Vidhan Sabha Election घेण्यात आल्या. असे असतानाही नागपूरच्या 11 जागा भाजपला राखता आल्या नाहीत.

ग्रामीणमधील सावनेर, उमरेड आणि काटोल-नरखेड काँग्रेस-राष्ट्रवादीने परत आपल्या ताब्यात घेतले. नागपूर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी भाजपचे सुधाकर देशमुख, उत्तरमधून माजी मंत्री नितीन राऊत यांनी भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना पराभूत केले. भाजपने नागपूरधील दोन विधानसभा गमावल्या आणि मध्य व दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार थोडक्यात बचावले.

सावनेरचे आमदार सुनील केदार यांचे बँक घोटाळा प्रकरणात सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे आजघडीला सावनेरमध्ये आमदारच नाही. उमरेडमधून काँग्रेसचे राजू पारवे निवडून आले होते. त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. ते रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत. पारवेच्या सोडचिठ्ठीने का होईना रामटेक लोकसभा मतदारसंघ तात्पुरता काँग्रेसमुक्त झाला आहे.

लोकसभा मतदारसंघाचा विचार करता दहा वर्षांपासून नागपूर जिल्हा काँग्रेसमुक्त आहे. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी सलग दोन निवडणुका जिंकल्या आहेत. गडकरी तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तुमाने यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे रामटेक काँग्रेसमुक्त ठेवण्याची जबाबदारी आता राजू पारवे यांच्यावर आली आहे.

Edited By : Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT