Lok Sabha Election 2024 : पवारसाहेब नसते तर अजितदादा गल्लीत..., जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

Jitendra Awhad News : शिमगोत्सवानिमित्त जमलेल्या नागरिकांना शरद पवार यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. तसेच मशाल चिन्हावर उभे असलेले विनायक राऊत आणि अनंत गिते या उमेदवारांच्या मशाली मतदान करून पेटवा आणि गद्दारांना जाळून टाका, असे आवाहन आव्हाडांनी केले.
Jitendra Awhad, Sharad Pawar, Ajit Pawar
Jitendra Awhad, Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad On Ajit Pawar: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 100 निर्णयांची इतिहासात नोंद आहे. यामध्ये लातूरचा भूकंपा असो वा महिला आरक्षणाचा मुद्दा किंवा कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचा निर्णय असो हे ऐतिहासिक निर्णय पवारांनी घेतले. मात्र, दुसरीकडे अजित पवार गटाने एक निर्णय सांगावा जो महाराष्ट्र विसरणार नाही.

फक्त अजित पवारांचा (Ajit Pawar) धरणाचा निर्णय तेवढा लोकांच्या लक्षात कायम राहिला आहे. बाकी एकही निर्णय लक्षात राहणारा नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केली आहे. शरद पवारांचे घर कोणी फोडले असेल तर ते रायगडचे उमेदवार सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) फोडले आहे, असा गंभीर आरोपही आव्हाडांनी केला.

सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही. म्हणून कोकणवासीयांनो सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांची जी औलाद निर्माण झालेली आहे, त्यांना कायमचे संपवायला पाहिजे, असं आव्हाड म्हणाले.

शिमगोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या पालखी नृत्यादरम्यान जमलेल्या नागरिकांना शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. तसेच मशाल चिन्हावर उभे असलेले विनायक राऊत आणि अनंत गिते (Vinayak Raut and Anant Geete) या उमेदवारांच्या मशाली मतदान करून पेटवा आणि गद्दारांना जाळून टाका, असे आवाहन आव्हाडांनी केले.

काल रविवारी (7 एप्रिल) कळवा येथे कोकणचा शिमगोत्सव व पालखी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनीही हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना आव्हाडांनी (Jitendra Awhad) अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Jitendra Awhad, Sharad Pawar, Ajit Pawar
Lok Sabha Pimpri : 'चार सौ पार'साठी बंद भोंगा सुरू करण्याचे काम चाललंय', सचिन अहिरांचा भाजपवर हल्लाबोल

आव्हाड म्हणाले, जेव्हा शरद पवारांचा वापर करायचा होता. तेव्हा तुम्ही त्यांचा पुरेपूर वापर करून घेतला. तसेच आता त्या माणसाने घर बनवले आणि त्यालाच सांगता घराबाहेर जा. असे कोणी वागतं का? असा सवाल करत नाव न घेता आव्हाडांनी अजित पवारांवर निशाणा साधला. तसेच सुनील तटकरे हे कायम अजित पवारांच्या कानात सांगायचे त्यांना काय दिले नाही.

पण ते आमचे नेते होतेच, शिवाय ते स्वतः आमदार-मंत्री, मुलगा-मुलगी, पुतण्या-भाऊ हेदेखील आमदार अशा पाच जणांना पदे दिलेले महाराष्ट्रातील घराणे सांगा तसेच अजित पवारांना 4 वेळा उपमुख्यमंत्री केले. तरी ही मंडळी विचारतात काय दिलं? याशिवाय शरद पवारांचे नाव नसते, तर असे अनेक अजित पवार गल्लीत फिरत असते, अशी टीका त्यांनी आव्हाडांनी केली.

Jitendra Awhad, Sharad Pawar, Ajit Pawar
Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातील इच्छुक थेट पवारांनाच म्हणाला, 'कुणी उमेदवार भेटतोय का नाही, तर मी आहेच'

कोकणी माणूस हा शिस्तबद्ध जीवन जगणारा

एसटी बसेस दोन वेळा फूल होतात, एक शिमगा आणि दुसरी गणपतीला. कोकण वासियांची नाळ जेवढी गावाकडे जोडलेली आहे. तेवढी कोणाचीच जोडलेली नसते. कोकणी माणूस हा फणसासारखा असतो. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लाइट बिल भरणारी जिल्हे कोकणातील आहेत. कोकणी माणूस हा शिस्तबद्ध पद्धतीने जीवन जगणारा माणूस असतो, असंही आव्हाड या वेळी म्हणाले.

(Edited By - Jagdish Patil)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com