Mumbai News : समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी क्रूरकर्मा औरंगजेबाबद्दल कौतुकोद्गार काढले होते. औरंगजेबाबाबत चुकीचा इतिहास दाखवला जात आहे.औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती,असे वक्तव्य आझमी यांनी केले होते.
या वक्तव्यानंतर राजकारण तापलंच,शिवाय निलंबनाची कारवाईची टांगती तलवारही होती. अखेर आझमींनी माफी मागितली.पण आता भाजपच्या फायरब्रँड नेत्या व माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आझमींना फटकारलं आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाविषयीच्या वक्तव्यावरुन मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचवेळी आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींवर हल्लाबोल केला आहे.
राणा म्हणाल्या,औरंगजेब हा चांगला प्रशासक होता,तर त्यांना मी लक्षात आणून देते की, त्यांनी एकदा छावा चित्रपट पाहावा. किंबहुना सरकारला मी आवाहन करते की, औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर नाव दिलं आहे. जे औरंगजेबला या राज्यात राहून आपला बाप मानून राहतात. अशा लोकांना उत्तर देण्याचं काम राज्य सरकारनं केलं पाहिजे,असंही नवनीत राणा यांनी सांगितलं.
आमच्या संभाजी महाराजांवर ज्यांनी क्रूर अत्याचार केला,अशा औरंगजेबची कबर त्या छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे. तसेच ज्यांना प्रेम आहे, त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबची कबर लावून घ्यावी, अशी संतप्त भावना नवनीत राणा यांनी दिली आहे. हिंदुत्व विचारधारेचं सरकार आमचं आहे,असं बेताल वक्तव्य करणाऱ्यांना क्षमा नाही,असेही त्या म्हणाल्या.
सपाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi)यांनी औरंगजेबावर स्तुतीसुमनं उधळली होती.ते म्हणाले होते,चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरांची उभारणी केली आहे. औरंगजेबाच्या एका सेनापतीला पंडिताच्या मुलीशी लग्न करायचं होतं.तेव्हा त्यांनी त्या सेनापतीला दोन हत्तींच्या पायाला बांधून ठार मारलं. शेवटी त्या पंडितांने तिथे त्याच्यासाठी मशीद बांधली,बनारसमध्ये ही मशीद बांधण्यात आली आहे. सध्या चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेब हा एक उत्तम प्रशासक होता,त्याला आपण क्रूर शासक मानत नाही, असंही आझमी यांनी म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.