
Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील क्रूरतेचा कळस गाठणारे फोटो व्हायरल झाल्यानं राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली. लोकभावना लक्षात घेतल्यानंतर सोमवारी(ता.3) रात्री अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचं 'अभय' काढून घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित पवारांना त्यांचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. आता मुंडेंचा (Dhananjay Munde) राजीनामा राष्ट्रवादीत कुणासाठी फायदेशीर ठरणार याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
तब्बल 84 दिवस बीड प्रकरणावरुन आवाज उठवल्यानंतर अखेर मुंडेंनी राजीनामा दिला. अखेरच्या क्षणी छगन भुजबळांचा पत्ता कट करुन मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या मुंडेंचीच महायुती सरकारमध्ये पहिली विकेट पडली. आता त्यांचा महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या नेत्याच्या पथ्यावर पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्याच दिवशी महायुती सरकारला पहिला धक्का बसला. संतोष देशमुख प्रकरणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सरकारवरचा दबाव वाढतच चालला होता. त्यामुळेच अधिवेशनातही सरकार बॅकफूटला जाण्याची शक्यता होती. पण पहिल्याच दिवशी सरपंच हत्येप्रकरणातील मारेकर्यांचे राक्षसी कृत्य दर्शवणारे फोटो माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानं महायुती सरकार आणखीच अडचणीत आले.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर वातावरण आणखी तापलं असून इतक्या दिवस अस्तित्व जाणवत नसलेली महाविकास आघाडीही आक्रमक झाली आहे. कुठेतरी महायुती सरकारविरोधात ते एकी करत मैदानात उतरले आहे. याचमुळे सरकारला दुसरा धक्का देण्याच्या पूर्णतयारी केली असल्याचे संकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहेत. पण याचवेळी धनंजय मुंडे यांच्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याचं मंत्रिपदं कोणाकडे दिले जाणार याविषयी राज्याच्या राजकारणासह राष्ट्रवादीच्या गोटातही चर्चा सुरू झाली आहे
महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं राज्याचं अन्न व नागरी पुरवठा खात्याचं मंत्रिपदासाठी अजित पवारांची पुन्हा तोच पत्ता गिरवण्याची शक्यता आहे.पुन्हा एकदा हे खातं ओबीसी समाजाच्या नेत्याकडेच दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.यात आता तीन नावं चर्चेत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी महायुती सरकारमध्ये ठरवून मंत्रिपद नाकारल्यानंतर आदळआपट व तीव्र नाराजीचं प्रदर्शन करत छगन भुजबळ हे या खात्यासाठीचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख दावेदार आहेत. यानंतर माजलगावचे आमदार व बीड हत्या प्रकरण उचलून धरत स्वपक्षीय नेते धनंजय मुंडेंवरच टीकेची तोफ डागणार्या प्रकाश सोळंकेंकडे हे खातं दिले जाण्याची शक्यता आहे. पण अजित पवार पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातच हे खातं देण्याची संधी फार कमी आहेत.
महायुती सरकारच्या गेल्या मंत्रिमंडळात अडीच वर्ष मंत्री राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांचा मंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट झाला आहे.हा दिलीप वळसे पाटील,छगन भुजबळ,धर्मरावबाबा आत्राम आणि संजय बनसोडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल पाटलांचा पत्ता कट करण्यात आला होता.आता पुन्हा त्यांच्या मंत्रिपदाच्या आशा उंचावल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.