Nagpur Municipal Corporation elections chandrashekhar bawankule sarkarnama
विदर्भ

BJP Vs Congress : भाजपचे ऑपरेशन महापालिका? काँग्रेसचे 30 माजी नगरसेवकांनाही फोडणार? 130 चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन

Nagpur Municipal Corporation elections : भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी ऑपरेशन टोलस आखत असतं. यासाठी मायक्रो प्लॅनिंग आखण्यात येते. आता नागपुरात देखील महापालिकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करण्याचा संकल्प भाजपने केला आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे 150 पैकी 108 नगरसेवक निवडूण आले होते. आता भाजपने 130 नगरसेवकांचे टार्गेट ठेवले आहे. ही बाब सध्या तरी अवघड वाटतं नसली तरी यासाठी एक मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे. काँग्रेसच्या सुमारे 30 माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. यापैकी काही माजी नगरसेवक स्वतःच भाजपकडून लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. हे ऑपरेशन सक्सेस झाल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.

महापालिका प्रभाग रचनेचे नोटिफिकशन निघाले आहे. प्रभार रचनेचा कार्यक्रम बघता ऑक्टोबर महिन्यात नागपूर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी भाजपचे आपल्याच नगरसेवकांचा एक सर्वे केला. त्यात नापास झालेल्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काही जणांची कामगिरी समाधानकारक तसेच जेमेतेम आढळून आली आहे. त्यांना संधी देण्यापूर्वी कामाला लागण्याचे निर्देश दिले आहे.

मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळाची कामगिरी घेऊन भाजपने संपूर्ण शहर ढवळून काढायला सुरुवात केली आहे. माजी नगरसेवक आणि इच्छुकांना प्रत्येक वॉर्डात चार सभा घ्यायच्या आहेत. या सभेची तयारी आणि खर्चसुद्धा इच्छुकाला करायचा आहे. याशिवाय एका प्रभागात चार कॉर्नर सभासुद्धा घ्यायच्या आहेत. या सभेला 200 ते 300 लोकांची गर्दी जमवायाची आहे. यात उत्तीर्ण होणाऱ्यांचा महापालिकेच्या निवडणुकीसाठी विचार केला जाणार आहे.

सोबतच ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आदी कार्यक्रमही घ्यायचे आहेत. यानंतर घर चलो अभियान राबवले जाणार आहे. या माध्यमातून मोदी, गडकरी आणि फडणवीस यांनी केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचवली जाणार आहेत. एवढे सारे करूनही 130 चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी काही प्रभावशाली व वैयक्तिक व्होट बँक असलेल्या काँग्रेस व इतर पक्षाच्या माजी नगरससेवकांकडेही भाजपने आपला मोर्चा वळवला आहे.

यात काही विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या माजी नगरसेवकांचाही समावेश असल्याचे समजते. काँग्रेससह उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवक नाराज आहेत. त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चार सदस्यांच्या प्रभागात निवडणूक लढणासाठी मोठे नेटवर्क, कार्यकर्त्यांची फळी, आर्थिक मदत आणि नेत्यांचा पाठिंब्याची गरज असते. याशिवाय चारही उमेदवार तोलामोलाचे असावे लागतात.

आज भाजप वगळता इतर पक्षाचे नागपूरमध्ये एवढे मोठे नेटवर्क नाही. निवडणूक लढून पराभूत होण्यापेक्षा आमच्या सोबत या आणि महापालिकेत सोबत रहा, असे सर्वांना सांगण्यात येत आहे. माजी नगरसेवकांपैकी अनेकांनी वयाची साठी गाठली आहे. आणखी पाच वर्ष रिकामे राहिल्यास प्रवाहाच्या बाहेर फेकले जाऊ याचीही चिंता अनेकांना आहे. याशिवाय छोट्यामोठ्या पक्षाचे आता भवितव्य शिल्लक राहणार नाही याची भीतीही अनेकांना सतावत आहे. अशा सर्वांची जुळवाजुळव भाजपवतीने सुरू असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT