Nagpur, 29 March : काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे हे नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणावर सोशल मीडियावरून बोचरी टीका टिपणी करत असतात. भाजपच्या वतीने आजवर त्यांच्यावर फार जहाल प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘एक्स'वर वैयक्तीक टीका केल्याने भाजपला चांगलेच झोंबले आहे. भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकुडे, आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आज भाजपच्या वतीने लोंढे यांच्या विरोधात गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमक्या देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने मदत केल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी लोंढे यांनी केली होती.
अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केलेल्या आरोपावर भाजपचे नेते चांगलेच संतापले आहेत. हे आरोप खोटे आहेत. ते लोकांमध्ये दिशाभूल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करीत असल्याचे भाजपे म्हणणे आहे. प्रतिक पडवेकर नावाचा कुठलाच व्यक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयात काम करीत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीवरून राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यात लोंढे यांच्या खोट्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये आणखीच गैरसमज निर्माण होऊन राज्यातील शांतता धोक्यात येऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याने लोंढे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे यांच्या उपस्थितीत गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. तो सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. न्यायालयाने त्याला जामीनसुद्धा नाकारला आहे. फरारी असताना तो कोणाच्या संपर्कात होता आणि त्याला कोणी कोणी मदत केली, याचा शोध पोलिस घेत आहे. फरारी असताना ज्या गाडीतून तो फिरला, त्या गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.