Congress Ladki Bahin Yojana Sarkarnama
विदर्भ

Ladki Bahin Yojna Dispute : लाडकी बहीण कार्यक्रमात काँग्रेस सरपंचाच्या पतीने घातला गोंधळ, गुन्हा दाखल

BJP Vs Congress : भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे आणि ग्राम पंचायत सदस्य मनोज दांदडे लाडकी बहीण योजनेची माहिती महिलांना देण्यासाठी सीर्सी येथे कार्यक्रम आयोजित केला होता.

Rajesh Charpe

Nagpur News : लाडकी बहीण योजना झपाट्याने लोकप्रिय होत चाचली आहे. सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकही याचे श्रेय घेण्याची धडपड करीत आहे. एकमेकांवर कुरघोडीसुद्धा केली जात आहे. यातून मोठा गोंधळ सुरू झाला आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघातील सिर्सी गावात लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.

कार्यक्रमामध्ये गोंधळ घाळणाऱ्यांमध्ये सरपंच याचे पती किशोर बुटे आणि त्यांचा मुलगा नामदेव बुटे यांचा समावेश आहे. गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी हा प्रकार घडला. त्यानंतर रात्री उशीरा या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे (BJP) माजी आमदार सुधीर पारवे आणि ग्राम पंचायत सदस्य मनोज दांदडे लाडकी बहीण योजनेची माहिती महिलांना देण्यासाठी सीर्सी येथे कार्यक्रम आयोजित केला होता. ग्रामपंचायतच्या अखत्यारित येणाऱ्या रंगनाथ महाराज देवस्थान समितीचे सभागृह यासाठी घेण्यात आले होते.

ज्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे पैसे आयोजकांनी भरले नाही, असा आरोप करून किशोर बुटे व त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांनी उपस्‍थितांनी शिवीगाळसुद्धा केल्याचे समजते. किशोर बुटे यांच्या पत्नी वंदना बुटे या येथे सरपंच आहेत.लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी ग्राम पंचयातच सभागृह घेण्यात आले होते. हा कार्यक्रम भाजपच्या पुढाकाराने घेण्यात आला. येथे सरपंच या काँग्रेसच्या (Congress) आहेत.

लाडकी बहिण योजना ही शासनाने जाहीर केली आहे. राज्य सरकारने या योजनेचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थी असलेल्या महिलेला व्हावी, यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. हा शासकीय कार्यक्रम असताना आयोजकांनी सरपंचांना बोलावण्यात आले नसल्याने त्यांचे पती किशोर बुटे यांनी राग काढल्याची चर्चा गावात आहे.सिर्सीचे ग्राम पंचयात सदस्य मनोज दांदडे, किशोर बुटे आणि नामदेव किशोर बुटे यांनी गोंधळ घालून शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.गुरुवारी रात्री एक वाजताच्या सुमारास पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT