BJP Politics : उत्तर नागपूरचे गणित भाजपला अवघड! विधानसभेला कसा असणार प्लॅन?

Nagpur North constituency BJP : नितीन गडकरी यांना शहरातील पाच मतदारसंघाने मताधिक्य दिले. मात्र उत्तर नागपूर मतदारसंघ यास अपवाद ठरला. बसपा कमजोर होत चालल्याने भाजपला मतविभाजनासाठी नवा भिडू शोधावा लागणार आहे.
Bjp flag
BJP flagSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : भाजपसाठी उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे गणित अधिकच अवघड होत चालले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघाने सर्वाधिक मताधिक्य काँग्रेसला मिळवून दिले आहे. त्यामुळे माजी मंत्री, विद्यमान आमदार नितीन राऊत निर्धास्त झाले आहेत. तर दुसरीकडे उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न भाजपला सतावत आहे.

2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांनी नितीन राऊत यांना पराभूत करून काँग्रेसला जबर धक्का दिला होता. राज्यात भाजपची सत्ता असताना हे यश आमदार माने यांना टिकवून ठेवता आले नाही. या विजयात माने किंवा भाजपेक्षा बसपाने केलेले मतविभाजन ही बाब महत्त्वाची ठरली होती.

पाच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत बसपा BSP कमजोर होताच पुन्हा एकदा राऊत हे निवडणूक जिंकले. लोकसभेच्या निवडणुकीत ‘संविधान धोक्यात' या महाविकास आघाडीच्या प्रचाराने उत्तरचे सारेच गणित बदलून गेले आहे. बसपाला त्यांचे केडरची मतेही टिकवता आली नाही.

नितीन गडकरी यांना शहरातील पाच मतदारसंघाने मताधिक्य दिले. मात्र उत्तर नागपूर मतदारसंघ यास अपवाद ठरला. बसपा कमजोर होत चालल्याने भाजपला मतविभाजनासाठी नवा भिडू शोधावा लागणार आहे. महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याने मतांचे विभाजन करणारा दुसरा प्रबळ पक्ष सध्यातरी शहरात अस्तित्वात नाही.

Bjp flag
Akola News : आमदाराने आषाढी एकादशीच्या दिवशीच दिला वारकऱ्याला दम, मोदींना टार्गेट केल्याचा राग; नेमकं प्रकरण काय?

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूरमध्ये भाजपने BJP यापूर्वी अनेक प्रयोग केले. माने यांचा अपवाद वगळता ही जागा भाजपला जिंकता आली नाही. आता संविधानचा मुद्दा ऐरणीवर असल्याने दलितांचा आधीच भाजपवर रोष आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत दलित मतदार भाजपपासून दूर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इच्छुकांची संख्या वाढली

माजी आमदार मिलिंद माने अलीकडे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. भाजपच्या बैठकांमधून संदीप गवई, संदीप जाधव, धर्मपाल मेश्राम यांचीही नावे अधूनमधून उत्तरमध्ये चर्चेला येतात. यापैकी तिघेही मतदारसंघातील रहिवासी नाहीत. मतदारसंघाच्या संघटनेत काम करणारे भाजपचे कार्यकर्ते त्यांना स्वीकारण्यास तयार नाही. प्रयोगच करायचा असेल तर मतदारसंघातील उमेदवार द्यावा, अशी मागणी उत्तर नागपूरच्या कार्यकर्त्यांची आहे.

(Edited by Roshan More)

Bjp flag
Mahavikas Aghadi : ‘सोलापूर शहर मध्य’ला तौफिक शेख, तर ‘शहर उत्तर’मधून महेश कोठे इच्छूक; महाआघाडीत बिघाडी अटळ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com