Uddhav Thackeray and Girish Mahajan Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : गिरीश महाजनांचं ठाकरेंना थेट चॅलेंज; म्हणाले, 'लोकसभेची एक तरी जागा...'

Uddhav Thackeray and Girish Mahajan : 'उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी त्यांच्या जागेवर कन्स्ट्रक्शन कराव, पण...', गिरीश महाजनांची खोचक टीका

Ganesh Thombare

Yavatmal News: लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून प्रत्येक राजकीय पक्षांनी संघटना बाधणीसाठी मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत. याबरोबरच महायुती आणि महाविकास आघाडीचे लोकसभेसाठी जागावाटप जवळपास निश्चित होत आले आहे. अशातच भाजप आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज देत लोकसभेची एक तरी जागा निवडून आणून दाखवावी, असं आव्हान दिलं आहे. (Lok Sabha Election 2024)

मंत्री गिरीश महाजन यांनी यवतमाळमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. "आमचे अध्यक्ष त्यांना विचारूनच काम करतात की काय, असे वाटायला लागले आहे. काहीही बोलायचं ? कुठेही अफवा पेरायच्या, हा त्यांचा उद्योगच झाला आहे. मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना सांगतो की, तुम्ही तुमच्या जागेवर कन्स्ट्रक्शन करा, आम्ही कुठल्या जागेवर लढायचं, किती जागेवर लढायचं, कुठून लढायचं ? हे आम्ही आमचं बघू. शिवसेनेने जेवढ्या जागा घेतल्या आहेत, त्यामधून एक जागा तरी निवडून आणून दाखवावी", असे थेट आव्हानच महाजनांनी ठाकरेंना दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाजनांनी जरांगे पाटलांना दिला 'हा' सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 28 फेब्रुवारीला यवतमाळच्या भारी परिसरात सभा होणार आहे. या सभा स्थळाची पाहणी आणि आढावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयावर चर्चा केली. याचवेळी जरांगे पाटलांनी टोकाची भूमिका न घेता जे आहे, त्या आग्रही मागण्या निश्चित कराव्यात, असा सल्ला देत आंदोलन, उपोषण करून यातून फार काही साध्य होणार नाही, असे स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांना सहा वेळा भेटलो. त्यांच्यासोबत बोलणी केली. दोन वेळा गुलाल उधळून झाला. मात्र, पुन्हा आठ दिवसांनी आंदोलन करत आहेत. पाटलांनी आंदोलन केल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलली. मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला. महाराष्ट्रात पहिल्यांदा इतक्या तातडीने काम झाले. कुठेतरी समाधान मानलं पाहिजे, असे मत महाजन यांनी व्यक्त केले. कायद्यात बसणारं आरक्षण दिलं. आता जरांगे पाटलांनी टोकाची भूमिका न घेता जे आहे, त्या आग्रही मागण्या निश्चित कराव्यात. पण आंदोलन उपोषण करून यातून फार काही साध्य होणार नाही, असंही गिरीश महाजन यांनी आवर्जून सांगितले.

राज्यात आठ दिवसांत पुन्हा राजकीय स्फोट होणार ?

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या भेटीवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, मी मागच्या वेळी सांगितले होते, राजकीय स्फोट होणार आहे. त्यावेळेस काँग्रेसमध्ये स्फोट झाला. मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात कौटुंबिक संबंध आहेत. ते दिवाळी-दसऱ्याला कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येत असतात. त्यामुळे ती कौटुंबिक भेट असेल. सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या भेटी संदर्भात अजितदादा सांगू शकतील. परंतु राज्यात आठ दिवसांत पुन्हा स्फोट होण्याची शक्यता आहे, असे सूचक विधान देखील गिरीश महाजन यांनी केले.

(Edited By-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT