Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis :
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis :Sarkarnama

Manoj Jarange Patil News : जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिस सतर्क; डीसीपींनी घेतला 'सागर' बंगल्याचा सुरक्षा आढावा...

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : "सागर बंगल्याजवळ कोणत्याही व्यक्तीला येथे थांबण्यास मज्जाव केला जात आहे."
Published on

Mumbai News : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता आपल्या आंतरवाली सराटी येथल्या आंदोलनस्थळावरुन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. यामुळे आता पोलिस खडबडून जागे झाले आहेत. सागर बंगल्याबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जरांगेंच्या आक्रमक भूमिकेनंतर आता पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis :
Nitesh Rane Vs Jarange : "...तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल", राणेंचा जरांगे-पाटलांना थेट इशारा

जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आता सागर बंगल्याभोवती सुरक्षेचे कडे अधिक कडक करण्यात आले आहे. सागर बंगल्याचा सुरक्षेचा आढावा डीसीपी मोहितकुमार गर्ग यांनी घेतला आहे. उच्चस्तरीय पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. पार्क केलेल्या गाड्या येथून हटवण्यात आले आहेत. आता सागर बंगल्यासंदर्भात हाय अलर्ट पोलिसांकडून देण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीला येथे थांबण्यास मज्जाव केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis :
Manoj Jarange News : मनोज जरांगेंचा राजकीय अजेंडा ठरला असेल तर राबवावा ; अतुल भातखळकरांचा आरोप

सागर बंगल्याकडे रवाना -

दरम्यान, जरांगेंच्या भावनांचा मोठा उद्रेक झाला. हे ओळखून तेथे उपस्थित समाजबांधवांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पाटील.. पाटील शांत राहा. दादा.. दादा स्वतःला सांभाळा. पाटील आम्हाला तुम्ही हवे आहेत, आरक्षण नंतर. आपण जाऊ पण आधी उपोषणामुळे तब्येतीची काळजी घेऊ, अशी आर्जव करण्यात आली. मात्र जरांगे पाटील कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी तडक व्यासपीठ सोडले आणि मुंबईतील फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) शासकीय निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत.

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis :
Nitesh Rane Vs Jarange : "...तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल", राणेंचा जरांगे-पाटलांना थेट इशारा

नितेश राणेंचा जरांगेंना इशारा -

"जरांगे-पाटलांनी राजकारण केलं आणि आमच्या नेतृत्वाला धमक्या दिल्या, तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल," असं नितेश राणेंनी (Nitesh Rane) म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिशीनी संवाद साधत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com